आदित्यंनतर आता तेजस ठाकरेंचे लॉंचिंग 

आदित्यंनतर आता तेजस ठाकरेंचे लॉंचिंग 

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेच्या राजकारणाला सुरवात केल्यापासून त्यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे यांनी राजकारणाचे धडे गिरवण्यास सुरवात केली आहे. 

पिताश्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आजपासून तेजस ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात राज्यभरात फिरणार आहेत. 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हातात शिवसेनेची सूत्रे आली.

निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचार यंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. 2002 मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजय मिळाला आणि पुढील वर्षी 2003 मध्ये उद्धव यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. 

कालांतराने उद्धव ठाकरे व त्यांचे चुलतभाऊ राज ठाकरे यांच्यातील दरीही रुंदावत गेली, परिणामी 2006 मध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली व मनसेची स्थापना केली. दरम्यानच्या काळात युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याबाबत सावध भूमिका शिवसेना नेतृत्वाने स्वीकारली होती. आदित्यला टप्प्याटप्प्याने राजकारणात सक्रिय केले. युवा सेनेची स्थापना करून त्याचे नेतृत्व आदित्य यांच्याकडे सोपविण्यात आले. 

आठ ते नऊ वर्षांत आदित्य ठाकरे मुंबई विद्यापीठ व अन्य कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवसेना आणि राजकारणात सक्रिय आहेत. आदित्य ठाकरे यंदा विधानसभेची निवडणूक लढवत आहेत.

काही दिवसांपासून तेजस ठाकरे शिवसेनेच्या कार्यक्रमात दिसत आहेत. काल झालेल्या दसरा मेळाव्याप्रसंगीदेखील तेजस ठाकरे वावरताना दिसत होते. आज उद्धव ठाकरे यांचा प्रचार संगमनेरमधून सुरू झाला असताना तेजस ठाकरे प्रचारात सक्रिय झाल्याचे चित्र आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com