ऑनलाईन सुनावणीला चक्क बनियानवर अवतरला वकील; न्यायमूर्तींचा सुनावणीला नकार

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असलेल्या सुनावणीला वकिलाने थेट बनियान घालून हजेरी लावल्याचा प्रकार राजस्थान उच्च न्यायालयात घडला आहे. यामुळे नाराज झालेल्या न्यायमूर्तींनी थेट सुनावणी घेण्यासच नकार देत पुढील सुनावणी 5 मे पर्यंत तहकूब केली आहे.
Advocate Appeared Before court in Banyan at Online Hearing
Advocate Appeared Before court in Banyan at Online Hearing

जयपूर : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत असलेल्या सुनावणीला वकिलाने थेट बनियान घालून हजेरी लावल्याचा प्रकार राजस्थान उच्च न्यायालयात घडला आहे. यामुळे नाराज झालेल्या न्यायमूर्तींनी थेट सुनावणी घेण्यासच नकार देत पुढील सुनावणी 5 मे पर्यंत तहकूब केली आहे.

सर्वोच्च न्यायालयापासून देशभरातील सर्वच न्यायालयांचे कामकाज सध्या व्हर्च्युअल पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे न्यायमूर्तींसह वकील आणि पक्षकार शक्‍य असेल त्याप्रमाणे ऑनलाईन सुनावणीला हजेरी लावतात. यामध्ये अनेक जण घरून, कार्यालयातून उपस्थित असतात. अशा वेळी हजेरी लावणाऱ्यांकडून ड्रेसकोडबाबत उल्लंघन किंवा ढिसाळपणा होऊ शकतो, याचा विचार करून प्रत्येक न्याय प्रशासनाने मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. यामध्ये योग्य त्या पेहरावात आणि न्यायालयात सुनावणी आहे, याचे भान ठेवण्याची सूचनाही करण्यात आली आहे.

मात्र, असे असतानाही राजस्थान न्यायालयामधील जयपूर खंडपीठापुढे नुकताच एका वकिलाने बनियान घालून सुनावणीला हजेरी लावली. न्या. संजीव शर्मा यांच्यापुढे शुक्रवारी (ता. २४) ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. न्या. शर्मा यांनी या पेहरावाबाबत नाराजी व्यक्त करत सुनावणी ५ मे पर्यंत तहकूब केली.

ड्रेसकोड आवश्‍यक

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी असली तरी न्यायालयाचा सन्मान राखून वकिलांनी त्यांच्या न्यायालयीन पेहरावात हजर राहायला हवे, असे न्याय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच आवाज म्युट करण्यावरही सूचना करण्यात आल्या आहेत. अन्यथा सुनावणीत व्यत्यय येऊ शकतो, असे नियमावलीत म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com