घरकुल खटल्यातील लढवय्ये सरकारी वकिल अॅड.निर्मलकुमार सूर्यवंशी

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाला कायदेशीर पटलावर अॅड. सूर्यवंशी यांनी खरी दिशा दिली. तपासाधिकाऱ्यांनी अॅड. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज केले. मुद्देसूद व प्रभावी मांडणीमुळे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आरोपींना त्यामुळे बराच काळ जामीन मिळू शकला नाही. प्रकृती बरी नसतानाही केवळ गरिबांच्या न्यायासाठी ते लढत होते. अनेक आर्थिक प्रलोभने नाकारून त्यांनी न्याय हक्कासह सत्याची कास कायम ठेवली.
Nirmalkumar Suryvanshi Govrnment Pleader in Jalgaon Case
Nirmalkumar Suryvanshi Govrnment Pleader in Jalgaon Case

धुळे : अनेक आर्थिक प्रलोभने, दबावाला बळी न पडता गरिबांसाठी न्यायाच्या संघर्षाने लढा देणारे विशेष सरकारी वकील (कै.) अॅड. निर्मलकुमार सूर्यवंशी उपाख्य 'एनडी नाना' यांच्यामुळे जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी ऐतिहासिक निकाल लागला. त्यांना विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. प्रवीण चव्हाण यांची मोलाची साथ लाभली. त्यांच्या परिश्रमाचे तर हे चीज आहेच. पण खऱ्या अर्थाने अॅड. सूर्यवंशी यांना या ऐतिहासिक निकालाचे श्रेय जाते, असे सांगत वकिलांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना  उजाळा दिला. 

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाला कायदेशीर पटलावर अॅड. सूर्यवंशी यांनी खरी दिशा दिली. तपासाधिकाऱ्यांनी अॅड. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज केले. मुद्देसूद व प्रभावी मांडणीमुळे राजकीयदृष्ट्या प्रभावशाली आरोपींना त्यामुळे बराच काळ जामीन मिळू शकला नाही. प्रकृती बरी नसतानाही केवळ गरिबांच्या न्यायासाठी ते लढत होते. अनेक आर्थिक प्रलोभने नाकारून त्यांनी न्याय हक्कासह सत्याची कास कायम ठेवली. त्यांचा प्रभावी युक्तिवाद, उलटतपासणीतील कौशल्य, घोटाळ्यातील खरे सूत्रधार कोण? आणि सह्याजीरावांचे त्यामुळे झालेले नुकसान याविषयी ते परखडपणे बोलत. 

वास्तव, वस्तुनिष्ठ आणि खरी भूमिका ते न्यायालयात कामकाजावेळी मांडत असताना अॅड. सूर्यवंशी यांच्याविषयी आरोपींनाही आदर निर्माण झाला. त्यांच्याकडे खटल्याचे कामकाज आल्याने न्यायच मिळेल, अशी प्रतिक्रिया जनतेत उमटत होती. त्याप्रमाणे खटल्याचा आज ऐतिहासिक निकाल लागू शकला. त्यांच्या या आठवणी कामकाजावेळी डोळ्यासमोर तराळत होत्या, अशी भावना न्यायालयात अनेक वकील, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. या खटल्याचा ऐतिहासिक निकाल हीच त्यांना अखेरची खरी श्रद्धांजली ठरल्याच्या प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. तसेच सोशल मीडियावर असंख्य मान्यवरांनी या स्वरूपात श्रद्धांजली वाहिली. 

'सकाळ'चे मुख्यबातमीदार निखील सूर्यवंशी यांचे ते वडील आहेत. या खटल्याचे आणखी एक विशेष म्हणजे निकालाची सूनावणी करतांना केवळ दोन पत्रकारांना न्यायालयात उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यात निखील सूर्यवंशी होते. या खटल्याचे सरकारी वकिल म्हणून कामकाज पाहणारे त्यांचे वडील निर्मलकुमार सूर्यवंशी हयात नसले तरी त्यांचे पुत्र आज न्यायालयात वार्तांकन करण्यासाठी उपस्थित होते. हा योगायोग आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com