administration proposes suspension of two tehsiladar | Sarkarnama

सुनील केंद्रेकरांमसोर दोन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव; डेप्युटी कलेक्टर कार्यमुक्त

दत्ता देशमुख
मंगळवार, 18 जून 2019

बीड : महसूल विभागातील अनागोंदीला लगाम लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुले यांच्या कार्यमुक्तीनंतर आता दोन तहसीलदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना पाठविण्यात आला आहे.

बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे आणि पाटोद्याच्या  तहसीलदार रूपा चित्रक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. प्रभोदय मुळे आणि अविनाश शिंगटे यांच्यावर चारा छावण्या , वाळू आणि पुरवठा विभागातील गैरप्रकरांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आहे तर रूपा  चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजात दुर्लक्षाचा ठपका ठेवण्यात आला आहे. 

बीड जिल्हा प्रशासनात मागच्या काही दिवसांपासून मोठ्याप्रमाणावर अनागोंदी माजल्याचे चित्र आहे. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दुष्काळी परिस्थितीही अनेक गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. बीड तालुक्यातील जनावरांच्या छावण्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ असल्याचे समोर आले असून याचा ठपका बीडचे तहसीलदार अविनाश शिंगटे आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. यासोबतच अवैध वाळू वाहतूक, उपसा याकडे दुर्लक्ष करण्याचा ठपका देखील ठेवण्यात आला आहे. 

याशिवाय तहसीलदार अविनाश शिंगटे यांच्यावर बीड तहसीलमधील पुरवठा विभागात सुरु असलेल्या अनागोंदीला लगाम लावण्यात कसूर केल्याचा ठपका आहे. बीडच्या गोदाम व्यवस्थापकावर वेळेत कारवाई केली नाही, धान्याच्या वितरणाकडे लक्ष दिले नाही असा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी यापूर्वीच दिला होता त्याचाही उल्लेख या निलंबन प्रस्तावात करण्यात आला आहे.

प्रभोदय मुळे  यांच्यावर वाळू , छावण्या यासह निवडणूक कामात केलेले दुर्लक्ष आणि कार्यालयीन कामातील निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला असून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. सतत वादात असलेल्या पाटोद्याच्या तहसीलदार रूपा  चित्रक यांच्यावर कार्यालयीन कामकाजाकडे दुर्लक्ष, अधिकारांचा गैरवापर करून बदल्या करणे, कर्मचाऱ्यांशी अरेरावी असे आरोप ठेवण्यात आले असून त्यांच्याही निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या प्रस्तावांवर आता कर्तव्यकठोर म्हणून ओळखले जाणारे विभागीय आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख