aditys thackrey speech in | Sarkarnama

मला नवा महाराष्ट्र घडवायचाय: आदित्य ठाकरे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

दुष्काळमुक्त, भयमुक्त, आत्महत्या व बेरोजगारमुक्त नवा महाराष्ट्र घडवणे हे माझे स्वप्न आहे, मात्र हे माझे एकट्याचे काम नाही, यासाठी विधानसभेत मला जिल्ह्यातील महायुतीच्या सर्व आमदारांची गरज आहे.

शिरोली पुलाची (कोल्हापूर):  माझ्याबरोबर महायुतीच्या सर्व उमेदवारांना तुमचा आशीर्वाद द्यावा, असे आवाहन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या विजय निर्धार सभेत ते बोलत होते. शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात ही सभा झाली.

आदित्य ठाकरे म्हणाले, "आता वेळ आली आहे, नव महाराष्ट्र घडवण्याची, बेरोजगारीमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त, सुशिक्षित व सुरक्षित महाराष्ट्र घडवण्याचे स्वप्न मी पाहिले आहे. मी एकटा नवा महाराष्ट्र घडवू शकत नाही, त्यासाठी मला तुमची भक्कम साथ हवी आहे व तेव्हाच सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडू शकेल.''

खासदार धैर्यशील माने म्हणाले, "विकासातून हातकणंगले तालुक्‍याला नवसंजीवनी देण्याचे काम आमदार डॉ. मिणचेकर यांनी केले आहे.''

आमदार डॉ. सुजित मिणचेकर म्हणाले, "निवडणुकीत आयात केलेल्या उमेदवारांना सूज्ञ मतदार जागा दाखवतील.'' 

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मंगलताई चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण यादव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण, नागावचे सरपंच अरुण माळी, मंगलराव माळगे, विजय भोसले, रावसाहेब तांबे, अभिनंदन सोळांकुरे, भाजपचे सतीश पाटील, माजी उपसरपंच राजेश पाटील, बाबासाहेब शिंगे, किरण मिठारी यांची भाषणे झाली. सुरेशदादा पाटील, संजय पाटील, सयाजी पाटील, अरविंद खोत, संदीप कारंडे, सुनील सुतार, भिकाजी सावंत आदी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख