Aditya Thakre Pursuing Complaints through social media | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

सोशल मिडियावरुन आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या मागे भुणभूण

सुचिता रहाटे
शनिवार, 29 एप्रिल 2017

आदित्य ठाकरे यांनी आपल्या ब्लॉग वर आपल्या मागण्या मांडायला सुरुवात केली आहे. अशा या युवानेत्यांचा 'डीझिटलायझेशन' कडे कल वाढलेला आहे आणि त्यात आपले युवासेना आदित्य ठाकरेही मागे नाहीत

मुंबई - युवासेना आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारींचा ससेमिरा लावला आहे. शिवसेनेचे युवानेता म्हणून आदित्य ठाकरे यांची ओळख आहे. सध्या सोशल मीडियाचे युवालोकांमध्ये खूप क्रेझ आहे. काहीही असेल मग  चांगल्या वाईट गोष्टी, भावना, राग हे सर्रास सोशल मीडियावरून प्रसिद्ध करतात. यासर्वांत आता सामान्य जनतेपासून ते नेतेमंडळी सगळेच अग्रेसर आहेत.

युवासेना आदित्य ठाकरे यांनी सुद्धा आपल्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडायला सुरुवात केली आहे. युवासेना आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ठाण्याच्या खाणीचे काम चालू करण्याप्रकरणी मुख्यमंर्त्यांकडे सोशल मीडियाच्या माध्यमांतून तक्रार केली आहे.

ठाणे येथे थांबविण्यात आलेल्या खाणीचे काम लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

खाणीचे काम थांबल्यामुळे रस्त्यांची कामे, महापालिकेची कामे तसेच रस्ते बांधणीसाठी लागणाऱ्या साहित्याचा तुटवडा भासत आहे असेही त्यांनी आपल्या ब्लॉग वर म्हटले आहे.

महापौर महाडेश्वर देखील ठाणाच्या खाणीवर मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत, तर मुख्यमंत्री यांनी देखील यावर लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी केली आहे.

असे एका पाठोपाठ एक आदित्य ठाकरे यांनी आपल्या ब्लॉग वर आपल्या मागण्या मांडायला सुरुवात केली आहे. अशा या युवानेत्यांचा 'डीझिटलायझेशन' कडे कल वाढलेला आहे आणि त्यात आपले युवासेना आदित्य ठाकरेही मागे नाहीत, आपले म्हणणे सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडून ते सामन्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याचा ते पुरेपूर वापर करताना दिसत आहेत.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख