अदित्य ठाकरे यांचे "आरे"ला "कारे" 

ADITYA-THAKRE
ADITYA-THAKRE

मुंबई : शिवसेनेने मुंबई मेट्रो 3 च्या आरेच्या हरित पट्ट्यात कारशेड उभारण्यास विरोध केला आहे. त्याची बाजू मांडताना आज ट्विट्ट करून युवासेना प्रमुख अदित्य ठाकरे यांनीही "आरे"ला "कारे" केले आहे. काल शिवसेनने मुंबई महानगरपालिकेच्या सुधार समितीत आरे कारडेशड प्रस्तावाला नामंजूर केले आहे. त्यामुळे भाजप सेनेत तणाव वाढत असताना या वादात युवा सेनाप्रमुखांनी उडी घेतली आहे. 

प्रस्ताव नाकण्याचे समर्थन करताना अदित्य ठाकरे म्हणतात, पर्याय उपलब्ध असताना  आरेची झाडे तोडू देणार नाही. मी मेट्रोचा पुरस्कार करतो. मेट्रोला पाठिंबा देतो. सार्वजनिक वाहतूकीसाठी मेट्रोची गरज आहे. हे मला मान्य आहे. यापुर्वीच्या सरकारनेही हा मागणी मान्य केली आहे. परंतु यामुळे आरेचे जे नुकसान होणार आहे ते चुकीचे आहे.

 एका बाजूला सरकार पॅंरिस कराराचा संबंध देवून हवामान बदलाच्या संकटाशी लढण्याची भाषा करते अन्‌ दुसऱ्या बाजूला आरेचे जंगल नष्ट करे हा दुट्टपी पणा आहे. मला चिंता वाटते हे की आपली हवामानबद्दलाची वक्तव्ये फक्ते वर्तमानपत्राच्या बातम्यासाठी, समाज माध्यमातील प्रचारासाठी राहू नये, अशी अपेक्षाही अदित्य ठाकरे म्हणतात. 

ठाकरे म्हणतात, मेट्रो महामंडळ अजूनही आरे वाचवू शकते. सार्वजनिक वाहतूकीसाठी झाडे तोडून जंगल नष्ट करणे हे चुकीचे आहे. पर्याय उपलब्ध आहेत. झाडे न तोडताही मेट्रो बनवता येईल याचा दावाही अदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com