Aditya Thakray Asks young workers to Start Election Work | Sarkarnama

कामाला लागा.....आदित्य ठाकरेंचे युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना आदेश

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 फेब्रुवारी 2019

निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ की नाही हे आताच सांगता येणार नाही' असे सांगणाऱ्या शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या यंगब्रिगेडला मात्र कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. जालना येथील पशुसंवर्धन विभागाच्या एक्‍स्पोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी हजेरी लावली. या संपुर्ण दौऱ्यात युवासेनेचे औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्यासोबत होते.

औरंगाबाद : निवडणुकीसाठी आम्ही एकत्र येऊ की नाही हे आताच सांगता येणार नाही' असे सांगणाऱ्या शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपल्या यंगब्रिगेडला मात्र कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. जालना येथील पशुसंवर्धन विभागाच्या एक्‍स्पोला आदित्य ठाकरे यांनी रविवारी हजेरी लावली. या संपुर्ण दौऱ्यात युवासेनेचे औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्यासोबत होते. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे यांनी युवासैनिकांसोबतच जेवण घेतले आणि आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असे आदेशही दिले.

आदित्य ठाकरे गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा मराठवाड्यात आले. याआधी परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात त्यांनी दुष्काळी भागाचा दौरा करत शेतकऱ्यांना मदत व जनवारांसाठी पशुखाद्य पुरवले होते. पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी जालन्यात आयोजित केलेल्या राष्ट्रीय महापशुधन प्रदर्शनाला देखील आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. महाराष्ट्रात शिवसेनेप्रमाणेच युवासेनेचे संघटन देखील महत्वाचे मानले जाते.

शिवसेनेत सध्या मंत्री, नेतेपदावर असलेल्या राजकारण्यांची अनेक तरूण मुलं युवासेनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या जालना दौऱ्याच्या निमित्ताने या सगळ्यांची आपल्या नेत्याशी भेट झाली. अभिमन्यू खोतकर, ऋषीकेश जैस्वाल, संतोष माने या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यात प्रामुख्याने समावेश होता. पशुप्रदर्शनाला भेट आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाचे लोकर्पण झाल्यानंतर दुपारी आदित्य ठाकरे यांनी आपल्या या पदाधिकाऱ्यांसाबेतच जेवण केले.

पशुप्रदर्शनातील नियोजन आणि देशभरातून आलेल्या विविध प्रजातींचे प्राणी, पशु पाहून आदित्य ठाकरे चांगेलच भारावले होते. याबद्दल आपल्या भाषणात त्यांनी अर्जून खोतकर यांचे कौतुक देखील केले. त्यामुळे प्रसन्न मुडमध्ये असलेले आदित्य ठाकरे जेवणाच्या वेळी पदाधिकाऱ्यांच्या गप्पांमध्ये चांगलेच रंगले होते. कधी संघटनेच्या कामाची माहिती घेत होते, तर कधी एखाद्या पदाधिकाऱ्याची फिरकी. हसत खेळत जेवण केल्यानंतर त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा, अशा सूचना देखील युवासेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख