शेतकऱ्यांनो, सेंद्रिय भाजीपाला पिकवा मी मुंबईत बाजारपेठ देतो : आदित्य ठाकरे  - Aditya Thakeray promises to help farmers of Parbhani | Politics Marathi News - Sarkarnama

शेतकऱ्यांनो, सेंद्रिय भाजीपाला पिकवा मी मुंबईत बाजारपेठ देतो : आदित्य ठाकरे 

गणेश पांडे 
बुधवार, 16 जानेवारी 2019

मुंबईत शिवसेनेचा आठवडी बाजार भरत आहे. या आठवडी बाजारात केवळ सेंद्रीयपध्दतीने उत्पादित करण्यात आलेला शेतमाल विक्रीसाठी ठेवला जाणार आहे.

-आदित्य ठाकरे

परभणी : " परभणी जिल्ह्यात सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत केलेल्या उत्पादनाला मुंबई येथील शिवसेनेच्या आठवडी बाजारात बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल ,'असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी (16) दिले.

एरंडेश्वर (ता.पूर्णा) येथे आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या पुढाकारातून दुष्काळ निवारण संकल्प शिबीर व जय भवानी महिला सुतगिरणीचे भुमिपुजन बुधवारी (ता.17) आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाले.

व्यासपीठावर खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहूल पाटील, आमदार जयप्रकाश मुंदडा, डॉ. विवेक नावंदर, वरूण सरदेसाई, सिध्देश कदम, राहूल कनळ, गणेश राजेभोसले, विष्णू पिंगळे, अमीत गिते, माजी आमदार मीरा रेंगे, डॉ. संप्रिया पाटील, अंबिका डहाळे आदींची उपस्थिती होती.

यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना आदित्य ठाकरे म्हणाले, "गेल्या दोन - तीन वर्षापासून दुष्काळाची भिषणता वाढत जात आहे. पंरतू या दुष्काळाचा सामना करतांना शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, आपल्याला अडचण आल्यास शिवसेनेचा विचार करा, शिवसेना तुमच्या मदतीला धावून येईल. "

" त्यामुळे परभणी सारख्या दुष्काळी जिल्ह्यात सेंद्रीय पध्दतीने उत्पादीत करण्यात आलेल्या शेतमालाला बाजारपेठ देण्याचे काम शिवसेना करणार आहे. मुंबईत शिवसेनेचा आठवडी बाजार भरत आहे. या आठवडी बाजारात केवळ सेंद्रीयपध्दतीने उत्पादित करण्यात आलेला शेतमाल विक्रीसाठी ठेवला जाणार आहे. या बाजारात परभणीच्या शेतकऱ्यांनी शेद्रीय पध्दतीने उत्पादित केलेला माल आणावा," असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. राहूल पाटील यांनी केले. सुत्रसंचलन अभय कुलकर्णी यांनी केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख