`आधी भगवा फडकवू...नंतर मुख्यमंत्रीपदाचे पाहू`

`आधी भगवा फडकवू...नंतर मुख्यमंत्रीपदाचे पाहू`

लातूर : शिवसेनाचा मुख्यमंत्री म्हणून युवा नेते आदित्य ठाकरे यांना पुढे आणले जात आहे. गेल्या काही दिवसापासून पक्षाच्या नेत्यांनी चर्चा सुरु केली आहे. यातच `जन आशीर्वाद यात्रे`च्या माध्यमातून आदित्य ठाकरे राज्यभर फिरत आहेत. मोठा मतदार असलेल्या तरुणांना ते आपल्याशी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून त्यांनी या यात्रेत `आदित्य संवाद` हा उपक्रम सुरु केला आहे. गुरुवारी असाच आदित्य संवाद येथे झाला.

यात एका तरुणाने मुख्यमंत्रीपदाच्या विचारलेल्या प्रश्नाला  `आधी भगवा फडकवू...नंतर मुख्यमंत्रीपदाचे पाहू` असे हसत हसत श्री. ठाकरे यांनी सांगितले. तरुणांनी देखील त्यांना तशीच दाद दिली. राज्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी पक्षाचे नेते मुंबई बाहेर पडले आहेत. युवा नेते आदित्य ठाकरे हे देखील जन आशीर्वाद यात्रा सुरु केली.

मोठ्या शहरात ते `आदित्य संवाद`  हा उपक्रम घेत आहेत. हा केवळ संवाद नाही तर त्याला एका रियालिटी शोचे रुप दिले जात आहे. अत्याधुनिक साऊंड सिस्टीमसह, तरुण तरुणीना टी शर्ट,  टोप्या, हातात फलक देवून योग्य जागेवर बसवले जात आहे. सभागृहात ठिकठिकाणी आदित्य ठाकरे व आदित्य संवादाचे फ्लेक्स लावले गेले होते. श्री. ठाकरे व्यासपीठावर येण्याअगोदर त्यांचे व्हिडीओ दाखवून वातावरण निर्मिती केली जाते.

श्री. ठाकरे व्यासपीठावर येताच हारतुरे, सत्काराला फाटा देत सरळ तरुणांशी संवाद करीत आहेत. यातून श्री. ठाकरे यांचे नेतृत्व तरुणात लोकप्रिय करणे  व  मोठ्या संख्येने मतदार असले्लया तरुण तरुणींना आपल्याशी करण्याचा हा शिवसेनाचा प्रयत्न सुरु आहे. या दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या  संवादाला  तरुण तरुणीनी चांगला प्रतिसाद दिला.

गेल्या काही दिवसापासून श्री. ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल चर्चा सुरु आहे. आजच्या संवादातही एका तरुणाने हा प्रश्नही विचारला. त्यावर आता निवडणुका येत आहेत. आधी भगवा फडकवू. नंतर मुख्यमंत्रपदाचे पाहू, असे हसतहसत उत्तर श्री. ठाकरे यांनी दिले.

राजकीय मेगा भरतीला तुम्ही महत्व देता की शासकीय मेगा भरतीला यावर श्री. ठाकरे यांनी आपण महाराष्ट्राला महत्व देतो असे उत्तर देवून तरुणांची मने जिंकली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवरही श्री. ठाकरे यांनी प्रकाश टाकला. शेतकऱयांनी आत्महत्याच करू नये असे नियोजन सुरु आहे. योजना राबवल्या जात आहेत. शेतकरी गेला तर आपल्याला जेवण कोण देणार? सरसकट कर्ज माफी झाल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. पाण्याचे राजकारण करण्यापेक्षा पडणाऱया पावसाचे नियोजन महत्वाचे आहे. यातून सह्याद्री पर्वत रांगेत पडणारे पावसाचे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल याचा प्रयत्न सुरु झाला आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले.

वाहन चालवण्यासाठी परवान्यासाठी, मतदान करण्यासाठी अठरा वर्षाची अट आहे. पण लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी या वयाची अट का नको असा प्रश्न उपस्थित करून सर्वच राजकीय पक्ष तरुणाच्या मागे पळतात पण त्यांना संधी
देत नाहीत अशी खंत व्यक्त केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com