आदित्य ठाकरेंना काळजी मोकळ्या भूखंडांची ! - Aditya Thakare worried about open spaces in Mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

आदित्य ठाकरेंना काळजी मोकळ्या भूखंडांची !

मिलिंद तांबे 
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

उरलेले भूखंड महापालिकेच्या ताब्यात राहावेत म्हणून लवकरात लवकर धोरण निश्‍चित करावे. - आदित्य ठाकरें

मुंबई  : महापालिकेच्या अनेक मोकळ्या भूखंडांवर अतिक्रमणे झाली आहेत. उरलेले भूखंड महापालिकेच्या ताब्यात राहावेत म्हणून लवकरात लवकर धोरण निश्‍चित करावे, अशी मागणी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव आणि अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. भाडेतत्त्वावरील भूखंडांवरील अनधिकृत बांधकामे व अटींचा भंग, भाडेकराराचे नूतनीकरण, भूसंपादन आदी मुद्द्यांवर धोरण ठरवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन, भाडेतत्त्वावर सायकल, उद्यान, पक्षीउद्यान, पदपथ सुधारणा, पादचारी मार्गाचे सुशोभीकरण, समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी बॉब कॅट मशीनचा वापर, फोर्ट परिसरात हेरिटेज फलक, फेरीवाल्यांच्या स्टॉलची मांडणी आदी विषयांवरही बैठकीत चर्चा झाली.

आदित्य ठाकरे यांनी महापौर, महापालिका आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष, वरळीतील नगरसेवक आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. वरळीला खड्डेमुक्त, कचरामुक्त आणि रोगराईमुक्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. वरळीतील प्रत्येकी आठ रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरण, 12 जंक्‍शनमध्ये सुधारणा आणि रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती त्यांनी दिली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख