Aditya Thakare will lead Maharashtra in future : Sanjay Raut | Sarkarnama

भविष्यात आदित्य ठाकरे राज्याचे नेतृत्व करतील : संजय राऊत

सरकारनामा
बुधवार, 12 जून 2019

 आदित्य ठाकरे भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करतील अशा घडामोडी राज्यात सुरू आहेत.

- खासदार संजय राऊत  

मुंबई :  " आदित्य ठाकरे भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करतील अशा घडामोडी राज्यात सुरू आहेत,'' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

खासदार संजय राऊत म्हणाले, " उप-मुख्यमंत्रिपद हे पद आदित्य ठाकरेंसाठी फार लहान आहे. भविष्यात त्यांनी राज्याचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा आहे. '' 

श्री. राऊत पुढे म्हणाले, "आदित्य ठाकरे यांची राज्यात स्वतःची प्रतिमा आहे. तरुणांत ते खूप लोकप्रिय आहेत. आदित्य ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि कार्यपद्धतीविषयी तरुण पिढीत जबरदस्त आकर्षण आहे. तरुण - युवा मतदारांची संख्या खूप वाढली आहे. त्यामुळे राजकारणात तरुण पिढीला संधी द्यायलाच हवी.''

" लोकसभेच्या उपसभापतिपदासाठी शिवसेनेने आग्रह धरलेला नाही. उप-सभापतिपद पदावर शिवसेनेचा नैसर्गिक हक्क आहे, अशी आमची भूमिका होती. पण भाजपने हे पद अन्य कोणाला दिले तर देऊ देत,'' असेही ते म्हणाले . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख