शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच: संजय राऊत  - Aditya Thakare will be Shivsena's CM candidate : Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच: संजय राऊत 

कैलास शिंदे 
बुधवार, 17 जुलै 2019

जळगाव: शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व भाजपचे नेते अमित शहा यांच्यात युतीची चर्चा झाली त्याच वेळी विधानसभेच्या जागा वाटपाचीही चर्चा झालेली आहे. जागा वाटपाचा नवीन फार्म्युला लवकरच समोर येईल. तसेच मुख्यमंत्रीपदाचीही अडचण नाही.  शिवसेनेकडे सत्ता आल्यास राज्याचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच असतील, असे मत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले. 

मुख्यमंत्रीपदाबाबत बोलतांना ते म्हणाले, युतीत मुख्यमंत्रीपदाचा कोणताही वाद नाही. युती करतांनाच दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्याबाबत ठरविलेले आहे. शिवसेनेकडे सत्ता आली तर मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच असतील . आदित्य ठाकरे यांच्यामध्ये नेतृत्वाचे सर्व गुण आहेत. राज्यातील जनतेची  आणि शिवसेना पक्षाचीही इच्छा आहे, की ते मुख्यमंत्री व्हावेत.    
 
शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे उदया (ता.18) पासून जळगावातून जन आर्शिवाद यात्रा सुरू करणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकाराज्यमंत्री व शिवसेनेचे उपनेते गुलाबराव पाटील, जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, गुलाबराव वाघ, शहरप्रमुख शरद तायडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना खासदार संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांची संपूर्ण महाराष्ट्रात जनआर्शिवाद यात्रा काढणार आहे. त्याची सुरूवात उदया(ता.18)पासून जळगावातून होत आहे. पहिल्या टप्यात उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यात ही यात्रा असेल. शुक्रवार (ता.21) नाशिक येथे यात्रेचा समारोप होईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख