प्लास्टिक बंदीच्या आढाव्यासाठी आदित्य ठाकरे मंत्रालयात

राज्यातील प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहिचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मंत्रालयात पोहोचले.आज दुपारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात ठाकरे यांनी आढावा घेतला
प्लास्टिक बंदीच्या आढाव्यासाठी आदित्य ठाकरे मंत्रालयात

मुंबई : राज्यातील प्लास्टिक बंदीच्या कार्यवाहिचा आढावा घेण्यासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज मंत्रालयात पोहोचले.आज दुपारी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या दालनात ठाकरे यांनी आढावा घेतला.यावेळी रामदास कदम, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव आदी उपस्थित होते.

यावेळी राज्यतील प्लास्टिक वंदिसाठी अधिक जनजागृति करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या.मोठ्या प्रमाणात प्रदूषण असलेल्या चेम्बूरच्या माहुल गाव येथील नागरिकांना अन्य ठिकाणी हलवणे गरजेचे असल्याचे मत आदित्य यांनी यावेळी व्यक्त केले.

आत्तापर्यंत प्लास्टिक बंदीची स्थिती
:- 290 टन प्लास्टिक जप्त

:- 2 कोटि 53 लाख दंड वसूल

:- प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत 25 लाख कापडी पिशव्या महापालिका, नागरपालिकांना वाटण्यात येणार

:- घन कचरा व्यावस्थापनासाठी 25 टक्के निधि जो राखून ठेवायचा आहे, त्यात जनजागृति, कापडी पिशव्या बनवणे यासाठी खर्च होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com