आदित्य ठाकरे वरळीतून विधानसभा निवडणूक लढविणार?

.
Aditya_Thakrey.
Aditya_Thakrey.

 मुंबई : युवासेना प्रमुख आणि  शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणार, अशी चर्चा आजपर्यंत होत होती पण आज त्यावर शिक्कामोर्तब झालेय . 

शिवसेनेतर्फे सध्या आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे . त्यासाठी त्यांना शिवसेनेचे वर्चस्व असलेला मुंबईतील मतदारसंघ शोधण्यात येत होता .

राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे युवानेते आणि  वरळी मतदारसंघाचे आमदार सचिन  अहिर यांनी शिवसेना प्रवेश केला तेंव्हापासून आदित्य ठाकरे वरळीतून लढणार अशी चर्चा सुरु झाली होती. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने आदित्य ठाकरे यांना वरळीत प्रबळ प्रतिस्पर्धी शिल्लक राहिलेला नाही . 

या पार्श्वभूमीवर आज म्हाडाच्या गुलजारीलाल नंदा सभागृहात पत्रकार परिषद घेऊन वरळी बीडीडी चाळ पुनर्वसन कामाची माहिती पत्रकारांना आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावरुन आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदार संघातून उभे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.  

यावेळी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी गृहनिर्माण राज्यमंत्री व म्हाडाचे माजी अध्यक्ष सचिन अहिर हेही उपस्थित होते. नुकतेच नारळी पौर्णिमेला त्यांनी कोळीबांधवांसमावेत नारळी पौर्णिमा साजरी केली होती, हे ही लक्षात घेण्यासारखे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com