Aditya Thakare Janashirvad Yatra Stars from Jalgaon | Sarkarnama

गणेशाचा आशिर्वाद घेवून आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेस जळगावातून प्रारंभ 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 18 जुलै 2019

शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनाआशिर्वाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ झाला. विसनजी नगरातील इच्छापूर्ती मंदिरात गणेशाची आरती करून त्यांनी यात्रेस सुरूवात केली. 

जळगाव : शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनाआशिर्वाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ झाला. विसनजी नगरातील इच्छापूर्ती मंदिरात गणेशाची आरती करून त्यांनी यात्रेस सुरूवात केली. 

युवासेना प्रमुख यांच्या राज्यस्तरीय जनआर्शिवाद यात्रेस जळगाव येथून प्रारंभ करण्यात आला. आज सकाळी साडेअकरा वाजता त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना प्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते जळगाव शहरातील विसनजी नगरातील श्री इच्छापूर्ती गणेश मंदिराकडे रवाना झाले. मंदिरात त्यांनी गणपतीची आरती करून दर्शन घेतले व यात्रेला प्रारंभ केला. 

यावेळी राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार संजय राऊत, राज्याचे सहकारराज्यमंत्री गुलाबराव पाटील,तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी त्यांच्या समवेत होते. यावेळी त्यांनी जनतेला हात उंचावून अभिवादन केले त्यावेळी जनतेतूनही त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ही यात्रा पाचोऱ्याकडे रवाना झाली. पाचोरा येथे यात्रेची पहिली जाहीर सभा होणार आहे. भडगाव, कासोदा, एरंडोल, धरणगाव, चोपडा, सावखेडा, अमळनेर, पारोळा येथून ही यात्रा आज धुळ्याकडे जाणार आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख