आदित्य ठाकरेंनी युवासेनेतील नाराज गटाला चर्चेसाठी  बोलावले मुंबईत 

नाराज कार्यकर्त्यांच्या भावना पोचवणार18 जानेवारी रोजी युवासेनेच्या जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुकत्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलण्यात आल्याची भावना त्यांच्यात आहे.जालना दौऱ्यात आमचे नेते आदित्य ठाकरे यांच्या कानावर हा प्रकार गेल्यामुळे त्यांनी या संदर्भात चर्चा करण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले आहे. समन्वयक म्हणून कार्यकर्त्यांच्या भावना आदित्य ठाकरे यांच्यासमोर मांडण्यासाठी मी जाणार आहे.- ऋषीकेश जैस्वाल (युवासेना कॉलेज कक्षप्रमुख)
Aditya-Thakare
Aditya-Thakare

औरंगाबादः जिल्ह्यातील युवासेना  उपजिल्हाधिकारी   नियुक्तीवरून संघटनेत दोन गट पडले असून नाराज गटाने युवासेनेच्या शाखा स्थापना, सदस्य नोंदणी अशा महत्वाच्या कार्यक्रमांकडे पाठ फिरवली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच जिल्ह्यातील युवासेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आल्याने याची गंभीर दखल युवासेनेचे अध्यक्ष अदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. या नियुक्‍त्यावरून सुरु असलेला वाद आणि सुरु झालेले राजीनाम नाट्य संपवण्यासाठी पुढील आठवड्यात जिल्ह्यातील नाराज गटाला मुंबईत बोलावण्यात आल्याची माहिती आहे. 

वैजापूर, कन्नड तालुक्‍यात नुकत्याच नव्या युवासेना उपजिल्हाधिकाऱ्यांच्या नेमणूका करण्यात आल्या होत्या. वैजापूर येथे भरत कदम यांची युवासेना उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर तालुक्‍यात असंतोषाचा भडका उडाला आणि तालुकाधिकारी सचिन वाणी यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना पत्र पाठवून कदम यांच्या नियुक्तीवर आक्षेप नोंदवला. 

शिवसेना किंवा युवासेनेच्या कुठल्याच सामाजिक, संघटनात्मक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नसतो, कदम यांची नियुक्ती करण्यापुर्वी तालुक्‍यातील कुठल्याच पदाधिकारी, कार्यकर्त्याचे मत विचारात घेण्यात आले नाही असा आरोप करत त्यांची नियुक्ती रद्द करावी अशी मागणी वाणी यांनी आपल्या 21 जानेवारी रोजीच्या पत्रात केली होती. 

कदम यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्यामुळे कदम यांची नियुक्ती तात्काळ रद्द करावी अन्यथा हे पत्र म्हणेजच आपला राजीनामा समजावा असे पत्रात नमूद करण्यात आले होते. 

सचिन वाणी यांच्यासह अनिल न्हावले, दादासाहेब आव्हाळे, विठ्ठल डमाळे, श्रीराम गायकवाड, शाम वसेकर, आजिंक्‍य निकम (उपतालुकाधिकारी), आमीर अली (शहराधिकारी), आतीस चाऊस, प्रशांत शिंदे, (उपशहराधिकारी), राहूल सोळुंके, अक्षय साठे या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले होते. 

जिल्ह्यात सध्या युवासेनेच्या नव्या शाखा स्थापन करण्याचे काम जोरात सुरू आहे. युवासेनेचे महाराष्ट्र उपसचिव राजेंद्र जंजाळ, युवासेना जिल्हाधिकारी ऋषीकेश खैरे यांच्या नेतृत्वाखाली नव्या शाखा स्थापन करण्यात येत आहेत.

पण जिल्हा युवासेना शाखेला विश्‍वासात न घेता परस्पर शाखा स्थापन केल्या जात असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यामुळे नाराज गटाने या शाखा स्थापनेच्या कार्यक्रमासह सदस्य नोंदणीकडे देखील पाठ फिरवल्याचे दिसून आले. 

दरम्यान, जालना येथील राष्ट्रीय महापशु प्रदर्शनाला भेट देण्यासाठी रविवारी आदित्य ठाकरे आले होते. यावेळी जिल्ह्यातील युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. सर्वसहमतीने यादी पाठवण्याचे आदेश दिलेले असतांना परस्पर आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 

लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा असे आदेश आदित्य ठाकरेंनी युवासेनेच्या कार्यकर्त्यांना दिले असतांनाच दुसरीकडे पदाधिकारी नियुक्तीवरचा वाद समोर आल्याने आदित्य ठाकरे यांनी याची गंभीर दखल घेतली. हा वाद मिटवण्यासाठी पुढील आठवड्यात मुंबईला या असे आदेश जिल्ह्यातील नाराज पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

कुणीही नाराज नाही - राजेंद्र जंजाळ

(युवासेना, महाराष्ट्र उपसचिव) 

युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या नियुकत्या या शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने होत असतात. त्यामुळे त्यावर आक्षेप न घेता पक्षाचे काम करणे हे पदाधिकाऱ्यांचे काम असते. ज्यांच्या नियुकत्या केल्या ते दोन-तीन वर्षांपासून युवासेनेत सक्रीय आहेत.

त्यामुळे कुणी नाराज आहे, पदाचे राजीनामे दिले असे काहीही नाही. युवासेनेचे मराठवाडा आणि राज्यातील काम मी पाहत असल्यामुळे आपल्याकडे तरी कुणाचे राजीनामे आलेले नाहीत. युवासेनेच्या शाखा स्थापना, सदस्य नोंदणी कार्यक्रम उत्साहात सुरू आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com