Aditya THakare demands Ashwini Bhide's transfer | Sarkarnama

आदित्य ठाकरे म्हणतात, मेट्रो वूमन अश्विनी भिडेंना बदला 

मिलिंद तांबे 
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

मुंबई : मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाची मुंबईकरांवर मनमानी सुरू आहे. मेट्रो प्राधिकरण म्हणजे पर्यावरण मंत्रालय आहे का? मेट्रो प्राधिकरण कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याचं सांगून न्यायालय आणि मुंबईकरांना धमकावत आहे.

आरे शिवाय इतर ठिकाणी काम करण्यास नकार देणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करा अशी मागणी राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत सर्व खापर त्यांच्यावरच फोडण्याचा प्रयत्न केला.

मुंबई : मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाची मुंबईकरांवर मनमानी सुरू आहे. मेट्रो प्राधिकरण म्हणजे पर्यावरण मंत्रालय आहे का? मेट्रो प्राधिकरण कारशेडसाठी अन्य जागेचा पर्याय नसल्याचं सांगून न्यायालय आणि मुंबईकरांना धमकावत आहे.

आरे शिवाय इतर ठिकाणी काम करण्यास नकार देणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली करा अशी मागणी राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी करत सर्व खापर त्यांच्यावरच फोडण्याचा प्रयत्न केला.

मुंबई मेट्रो रेल प्राधिकरणाने आरे परिसरात मेट्रोचे कारशेड उभारण्याचा घाट घातला आहे.यावरून आज आदित्य ठाकरे यांनी मेट्रो प्राधिकरण आणि सरकारच्या नावाने थयथयाट केला. आरेमध्ये कारशेड उभारल्याने मुंबईतील एकमेव असणारा हरितपट्टा नष्ट होणार आहे. जैव विविधता नामशेष होणार आहे याचा कुणी विचार करणार आहे की नाही. मेट्रो प्राधिकरणाचे अधिकारी म्हणतात आरेमध्ये कारशेड नाही झालं तर मेट्रोचा प्रकल्प रखडेल. अस म्हणणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून त्यांची बदली करावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.

आरे हा मुंबईचा प्राणवायू आहे.आरेला अद्याप 'फॉरेस्ट' म्हणून घोषित करण्यात आलेले नाही ते कारावं. हे फक्त 2700 झाडांबद्दल नाही आहे,हे बायो - डायव्हर्सिटी बद्दल आहे. लोकांचा जो आवाज आहे तो सरकारने ऐकावा, मेट्रो प्राधिकरणाने ने ऐकावा. कारशेडला पर्यायी जागा सुचविण्यासाठी आम्ही कन्सल्टंट नाही.

नेमलेले कन्सल्टंट जर पर्याय सुचवू शकत नसतील तर त्यांना बदला. मुख्यमंत्र्यांनी त्या अधिकाऱ्यांना नेमावं ज्यांना मुंबईवर प्रेम आहे. आता आम्ही वायफाय हॉटस्पॉट देऊ अस सरकार सांगतय.पण आरे नष्ट झाल्यास ऑक्सिजन स्पॉट तयार करावे लागतील. पण काहीही झाले तरी आम्ही आरेला हात लावू देणार नाही असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

 

पालिका आयुक्तांना अभय ?

Image result for pravinsingh pardeshi facebook

आरे प्रकरणी आज आदित्य ठाकरे यांनी अश्विनी भिडे यांच्यावर सडकून टीका करत सर्व खापर त्यांच्यावर फोडलं.मात्र शिवसेनेची सत्ता असणाऱ्या पालिका आयुक्त प्रविणसिंग परदेशी यांच्या नावाचा उल्लेख ही त्यांनी केला नाही.प्रविणसिंग परदेशी हेच पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीचे अध्यक्ष आहेत.

यांच्याच नेतृत्वाखाली आरे मधील 2700 झाडं तोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.मेट्रो कारशेड आरे मध्येच होणं आवश्यक असल्याचे ते पालिकेच्या बैठकांमध्ये वारंवार सांगत आहेत.अस असून देखील आदित्य ठाकरे यांचा परदेशी यांना अभय का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख