आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा उद्या औरंगाबाद जिल्ह्यात

 आदित्य ठाकरेंची जनआशीर्वाद यात्रा उद्या औरंगाबाद जिल्ह्यात

औरंगाबाद : शिवसेना नेते युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा येत्या 30 व 31 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यात येत आहे. गुरुवारी सायंकाळीच चिकलठाणा येथे जनाशीर्वाद यात्रेचे आगमन होणार आहे. शिवसेनेकडून या यात्रेची जोरदार तयारी सुरू आहे. मतदार राजाचे आभार मानून त्यांची मने जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रात जनआशीर्वाद यात्रा काढली आहे. कोल्हापूर, सांगली येथील पुराच्या परिस्थितीमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता नव्याने यात्रेला सुरूवात झाली आहे. 29 ऑगस्ट गुरुवार रोजी संध्याकाळी 6 वाजता चिकलठाणा येथे यात्रा दाखल होणार असून या ठिकाणी यात्रेचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. 

आदित्य ठाकरे यांच्या हस्ते 30 ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी शहरातील ताठे मंगल कार्यालयात शंभर गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता पैठण येथे विजय संकल्प मेळावा होणार आहे. दुपारी वाळूज येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन, रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. दुपारी लासुर स्टेशन व वैजापूर येथे विजय संकल्प मेळावा होणार असून कन्नड तालुक्‍यातील औराळा येथे आदित्य ठाकरे बैल पोळा सणात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी कन्नड येथेही विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी खुल्ताबाद येथील पंचायत समिती इमारतीचे भूमिपूजन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. 

बजाजनगर 31 ऑगस्ट रोजी सायंकाळी येथील विजय संकल्प मेळाव्याला आदित्य ठाकरे उपस्थित राहतील. यावेळी जिल्ह्यातील विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांशी आदित्य ठाकरे ठिकठिकाणी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com