उदयनराजेंचे आशिर्वाद घेण्यासाठी पाटणला आलो!

उदयनराजे म्हणाले, जनसुमदाय पाहून प्रचार सभा नसून ही विजयी सभा असल्याचे वाटते. विचारांनी लोक एकत्र येतात, तेव्हा कोणतेही आमिष त्यांना लागू पडत नाही. काही लोक स्वार्थामुळे एकत्र येतात. इतर पक्षांची आज वाताहत झाली आहे.
उदयनराजेंचे आशिर्वाद घेण्यासाठी पाटणला आलो!

मल्हारपेठ (सातारा) : कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट कारभारामुळेच सातारा जिल्हा विकासापासून दूर ठेवण्याचे पाप आघाडी शासनाच्या काळात झाले. मात्र शिवसेना - भाजप युती सरकारच्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम्‌ केला जाईल, असे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यानी केले.

सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले व पाटणचे शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारार्थ मल्हारपेठ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. नितिन बानुगडे-पाटील, उमेदवार श्री. भोसले, पुरुषोत्तम जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख रणजित भोसले, जिल्हाध्यक्ष जयवंत शेलार, विक्रमबाबा पाटणकर उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, " जनसमुदाय व व्यासपीठावरील मान्यवर पाहता प्रचार करायची गरज आहे काय ? पाच वर्षात इतकं भरभरून दिलेले असताना प्रचाराची आवश्‍यकताच काय आहे ? आज असणारे वातावरण 24 तारखेलाही दिसेल. इथं आलो ते उदयनराजेंचे आशिर्वाद घेण्यासाठी. जिल्ह्यात आत्तापर्यंत राष्ट्रवादी जिंकत होती, मात्र आत्ता यापुढे राष्ट्रवाद जिंकणार. कारण जे बोलतो, ते करून दाखवणारे सरकार आहे. जनतेची सेवा करण्यासाठी मी ही निवडणूक रिंगणात उतरलो आहे. 

प्रा. नितीन बानुगडे- पाटील म्हणाले, जिल्ह्यात जिकडे उदयनराजे तिकडे जिल्ह्याची सत्ता असे गणित आहे. सिंचन घोटाळ्यात जनतेचे पैसै खाणारेच आज उदयनराजेंनी जनतेचा पैसा वाया घालवला असे म्हणत आहेत. राजीनामा द्यायला वाघाचं काळीज लागते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com