माझी लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही!

समरजित घाटगे यांचे नाव न घेता श्री. घाटगे म्हणाले, ""मतदारसंघाच्या विकासासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या पाठीशी असल्याचे काहीजण सांगत आहेत. पाटील व फडणवीस हे पक्षनिष्ठा पाळणारे नेते आहेत. यामुळे त्यांच्या नावाने त्यांनी मते मागू नयेत. काही तरी अफवा पसरवून जनतेची दिशाभूल करू नये.''
माझी लढाई मुख्यमंत्रिपदासाठी नाही!

गडहिंग्लज (कोल्हापूर): सर्वसामान्यांचा आवाज विधानसभेपर्यंत पोचवण्यासह बेरोजगारी मुक्त, कर्जमुक्त, दुष्काळमुक्त, प्रदूषणमुक्त नवा महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न आहे. माझी लढाई ही मुख्यमंत्रिपदासाठी अथवा स्वार्थासाठी नाही, असे मत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. 

महायुतीचे कागलचे उमेदवार संजय घाटगे व चंदगडचे उमेदवार संग्राम कुपेकर यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रचाराचा प्रारंभ केला. खासदार संजय मंडलिक, श्री. घाटगे, श्री. कुपेकर, अंबरिश घाटगे, संजय पवार, विजय देवणे, उत्तम कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर हा मेळावा झाला.

श्री. ठाकरे म्हणाले, "पंधरा वर्षांत आघाडीने राज्याला मागे नेले आहे. पाच वर्षांत महायुती सरकारने विविध क्षेत्रात दमदार कामगिरी केली. सत्ता असो किंवा नसो शिवसेना नेहमी लोकांच्या सेवेत राहिली आहे. मुख्यमंत्रिपदाची मुळीच इच्छा नसून केवळ सेवेसाठीच विधानभवनात पोचण्याची लढाई आहे. पाच वर्षे शिवसेना सत्तेत होती. परंतु, सरकारची चूक दाखवण्यासह जनतेच्या अन्यायाविरूद्ध रस्त्यावर उतरण्यासही मागेपुढे पाहिले नाही.''

खासदार मंडलिक म्हणाले, "शिवसेना शब्द पाळणारा पक्ष आहे. कधीच हा पक्ष विश्‍वासघात करीत नाही. कागलमधील सर्वच उमेदवारांनी सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारकाचे दर्शन घेतले. उशिरा का होईना सर्वांना उपरती झाली याचा आनंद आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवारांना लाखोंच्या मतांनी विजयी करा.''

श्री. कुपेकर, श्री. घाटगे यांनीही चंदगड व कागल मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विजयाचे आवाहन केले. यावेळी गडहिंग्लज, कागल, चंदगड व आजरा तालुक्‍यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाप्रमुख दिलीप माने यांनी सूत्रसंचालन केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com