पात्र शेतकऱ्यांनो नावे शिवसेनेकडे द्या, कर्जमुक्ती करून घेऊ, आदित्य ठाकरेंचे आवाहन 

पात्र शेतकऱ्यांनो नावे शिवसेनेकडे द्या, कर्जमुक्ती करून घेऊ, आदित्य ठाकरेंचे आवाहन 

बाळापूर : " पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली नसेल तर तुमची नावे, दाखले द्या शिवसेनेकडे द्या ! तुमची कर्जमुक्ती करून घेऊ, सरसकट कर्जमुक्ती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे वचन शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज केले आहे. 

शेतकऱ्यांचे प्रश्‍न जाणून घेण्यासाठी आदित्य ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर होते. बाळापूर येथे आयोजित केलेल्या सभेत बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवर पुन्हा एकदा आपला आवाज बुलंद केला आहे. 

यावेळी शेतकऱ्यांशी आपल्या भाषणात संवाद साधताना ते म्हणाले, की युती करीत असताना आपली पहिली अट ही सरसकट कर्जमुक्तीची होती. येथे आलेल्या शेतकऱ्यांनो आपले कर्ज माफ झाले का ? ज्यांची कर्ज माफ झाली आहेत अशानी हात वर करा ?

कर्जमाफीसाठी आपण पात्र आहात का ? असा सवाल केला असता शेतकरी म्हणाले, की हो आम्ही पात्र आहोत. त्यावर आदित्य म्हणाले, की मला हेच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसते. जे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत त्यांची कर्ज माफ झालीच पाहिजे. सरसकट कर्जमुक्ती झालीच पाहिजे. 

मी तुम्हाला वचन देतो की कर्जमुक्तीवर आपण आता थांबायचे नाही. सरसकट कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. ज्यांची कर्जमुक्ती झाली नाही त्यांना कर्जमुक्ती दिल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असेही आदित्य यावेळी म्हणाले. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी कर्जमुक्तीबाबत शेतकऱ्यांना केलेल्या आवाहनावर माजी खासदार आणि शिवसेनेचे कडवे विरोधक निलेश राणे यांनी ट्टिट करून जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, की पाच वर्षे पेंग्वीनमध्ये गेली आणि आता म्हणतायत कर्जमुक्तीसाठी शिवसेनेकडे अर्ज करा. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com