सत्ता स्थापनेच्या हालचाली गतीमान, आदित्यंचा कोकण दौरा रद्द 

सत्ता स्थापनेच्या हालचाली गतीमान, आदित्यंचा कोकण दौरा रद्द 

मुंबई : शिवसेना आमदारांची तातडीने बैठक बोलविण्यात आल्याने पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी आपला कोकण दौरा पुढे ढकलला आहे. 

विधानसभा निकालानंतर सत्ता स्थापनेसाठी हालचाली गतीमान झाल्या असून भाजप विधिमंडळ नेतेपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. त्यामुळे फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहे. भाजपने नगरविकास, गृह, विधानसभा अध्यक्षपद सोडण्याची तयारी दाखविलेली नाही. ही महत्त्वाची खाती या पक्षाकडेच राहणार असल्याचे दिसून येत आहे. महायुतीत शिवसेना असल्यानी सत्तेत सहभागी होणार आहे. 

शिवसेना आमदारांचा आकडा कमी झाला असला तरी सत्तेतील भागीदारी वाढण्याची शक्‍यता आहे. भाजपला शिवसेनेला बरोबर घेऊनच सरकार स्थापन करावे लागणार आहे. शिवसेनेने अद्याप आपला पत्ता उघडला नाही. त्यामुळे या पक्षाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेनेही आमदारांची तातडीची बैठक बोलविली आहे. यावेळी शिवसेना महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. या बैठकीसाठी थांबणे गरजेचे असल्याचे आदित्य यांनी आपला कोकण दौरा पुढे ढकलला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com