अखेर आदित्य ठाकरेंच्या ओठांवर 'दिशा'चं नाव आलंच! 

अवधूत गुप्ते आदित्य यांना म्हणाले, की आपकी बात पटनी चाहिए. त्यावर आदित्य उत्तरले, तुमची दिशा चुकली! या प्रश्‍नोत्तराने लोकांमध्ये एकच हशा पिकला.
aditya-thackrey
aditya-thackrey

नगर : सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या माध्यमातून आदित्योदय झाला आहे. आदित्य ठाकरे मंत्री झाल्याने ते आणखीच वलयांकित झाले आहेत. ते काय खातात, त्यांना काय आवडते, कोण कोण आवडते, या विषयी लोकांमध्ये, तसेच माध्यमांमध्ये चर्चा झडत असते. त्याबाबत आदित्य यांना वारंवार प्रश्‍नही विचारले जातात. मात्र, त्यांनी आपल्या मनाची 'दिशा' काही कळू दिली नाही, तरीही त्यांच्या मनात कुणीतरी दडल्याचं आज लोकांना कळालं.

आज (ता. 17) संगमनेरमध्ये अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली. त्या मनात दडलेली 'दिशा' शोधण्याचा प्रयत्न गुप्ते यांनी केला.

अवधूत गुप्ते यांनी अभिनेत्री दिशा पटनीबाबत छेडलं. "आम्हाला बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात पटनी चाहिए. आपका उत्तर पटानी चाहिए.'' यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची दिशा चुकलेली आहे, असं म्हणताच तो प्रश्‍न लीलया टोलवून लावला. मात्र, त्यानंतर उपस्थितांना कळलं आदित्य यांच्या मनात कोण लपलंय ते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com