हाऊसमध्ये जाण्याची हौस माझीच होती : आदित्य

मी आदित्य संवाद कार्यक्रम सुरू केला. अशा कार्यक्रमांतून लोकांचे प्रश्न विचारण्याचं धाडस वाढतं. असे कार्यक्रम चांगली बाब आहे. वलय मिळालं तरी आपल्यात बदल झाला नाही पाहिजे, असं आजोबा आणि वडिलांनी मला सांगितलं आहे. राजकारण्यांची खासियत दहा वर्षांपूर्वी बोललेलं आठवत नाही; पण आम्ही महाविकास आघाडीत लक्षात ठेवतो.
aditya thackrey on contest election
aditya thackrey on contest election

नगर : आई सांगायची राजकारणात जाऊ नको, बाबा आहेत. आजोबा आहेत. पेपरात चांगलं येतं, वाईट येतं. पण हाऊसमध्ये जाण्याची हौस माझीच होती, असे स्पष्टीकरण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.

आज (ता. 17) संगमनेरमध्ये अमृतवाहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, आई-वडिलांनी आपल्याला मोठं केलेलं असतं. आई आपल्याला आजही ओरडते, ते प्रेमाने असतं. आई सांगायची राजकारणात जाऊ नको, बाबा आहेत. आजोबा आहेत. पेपरात चांगलं येतं, वाईट येतं. पण हाऊसमध्ये (विधीमंडळात) जाण्याची हौस माझीच होती. त्यामुळे शपथ घेताना मी आईचं नाव घेतलं. आजोबा हे वेगळं व्यक्तिमत्त्व होतं. मागे कुणीतरी महाराष्ट्राचे चार तुकडे होऊ शकतात असं म्हटलं. पण शिवसेनेत जात, धर्म आणि विभाग कधीही पाहिला जात नव्हता. महाराष्ट्राचं भविष्य घडवायचं आहे, म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत.

आता जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर
आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडे देते. रश्‍मी वहिनींनी किती वर्ष तुमची जबाबदारी घ्यायची? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांना अवधूत गुप्ते यांनी विचारला. या प्रश्नावर उपस्थित असलेल्या लोकांनी एकच कल्ला केला. या प्रश्‍नावरही आदित्य कचरले नाहीत. ""आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईने मुख्यमंत्र्यांकडे सोपवली आहे,'' या प्रश्‍नालाही लोकांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com