`आदित्य ठाकरे पैठणच्या "पैठणी' ला वैभव मिळवून देणार`

..
`आदित्य ठाकरे पैठणच्या "पैठणी' ला वैभव मिळवून देणार`

औरंगाबादः राज्याचे पर्यटन मंत्री तथा युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे लवकरच पैठणला भेट देऊन येथील पैठणी तयार करणाऱ्या महिलांची भेट घेणार आहेत. पैठणची पैठणी इतर भागात पळवण्याचे काम झाले, पण आपण पुन्हा या पैठणीला गत वैभव प्राप्त करून देणार आहोत. आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयातील प्रदर्शनात पैठणी ठेवणार असल्याचे सांगतिले आहे. पैठणीचा प्रचार आणि प्रसार करण्यसाठी निधी देण्याचे देखील आदित्य ठाकरे यांनी मान्य केल्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी सांगितले.

पैठण येथील बाळासाहेब ठाकरे कृषी व्यापारी संकुलाचे भूमीपूजन संदीपान भुमरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी पैठणचा रस्ता, उद्यान, नाथ मंदिर आणि पैठणी संदर्भात राज्य पातळीवर अनेक निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना भुमरे म्हणाले, लवकरच आदित्य ठाकरे पैठणला येणार आहेत. या भेटीत ते नाथ मंदिराला भेट देणार असून पैठणी विणणाऱ्या महिला व कारखान्याला देखील ते भेट देणार आहेत.

मुंबईच्या मंत्रालयात विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे दालन आहे, त्या दालनात आता पैठणची पैठणी देखील ठेवण्याचा निर्णय आदित्य ठाकरे यांनी केला आहे. एवढेच नाही, तर पैठणीची प्रसार आणि विक्रीसाठी आवश्‍यक त्या उपाययोजना आणि निधी देण्याचा शब्द देखील त्यांनी मला दिला आहे.

या शिवाय पैठणच्या रस्त्याच्या प्रश्‍नावर देखील आपली केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, सर्वाजनिक बांधका मंत्री अशोक चव्हाण यांच्यांशी चर्चा झाली आहे. नॅशनल हायवेमधून हा रस्ता करून देण्याचे आश्‍वासन गडकरी यांनी दिले आहे. तर त्यात अडचण आली तर आपण शासनाकडून हा रस्ता करू असा शब्द अशोक चव्हाण यांनी दिला. त्यामुळे येत्या चार पाच महिन्यात रस्त्याचा प्रश्‍न सुटेल असा विश्‍वास देखील भुमरे यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्यानासाठी निधी मिळणार..

पैठणमधील संत ज्ञानेश्‍वर उद्यानाचा प्रश्‍न रखडलेला आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी माझ्या खात्याच्या बजेट संदर्भात झालेल्या बैठकीत त्यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे उद्यानाचा प्रश्‍न देखील लवकरच मार्गी लागेल. खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आपण बाळासाहबे ठाकरे यांच्या नावाने कृषी व्यापारी संकुल उभारत आहोत. लवकरच जिनिंग आणि ऑईलमील सुरू करण्याचा देखील आपला प्रयत्न असणार आहे असेही भुमरे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com