Aditya Thackeray Stalls Mumbai Corporation Committee Tours | Sarkarnama

मुंबई महापालिकेच्या दौऱ्यांना आदित्य ठाकरेंनी लावला चाप

रामनाथ दवणे
सोमवार, 27 जानेवारी 2020

महापालिकेच्या वैधानिक समितीसह विशेष समित्यांचे अभ्यास दौरे अखेर रद्द करण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या अभ्यास दौर्‍यांना चाप लावत सर्व दौरे रद्द करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई : महापालिकेच्या वैधानिक समितीसह विशेष समित्यांचे अभ्यास दौरे अखेर रद्द करण्यात आले आहेत. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या अभ्यास दौर्‍यांना चाप लावत सर्व दौरे रद्द करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती मिळत आहे. 

त्यामुळेच महापालिकेच्या अधिकृत अभ्यास दौर्‍यासह आरोग्य समितीच्या माध्यमातून काढण्यात येणार्‍या खासगी चीन दौर्‍यालाही काट मारण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या विविध वैधानिक आणि विशेष समिती अध्यक्ष आणि सदस्यांसह अधिकार्‍यांच्या दौर्‍याला गटनेत्यांच्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. 

त्यानुसार सुधार समितीचा अभ्यास दौरा बंगळुरू, म्हैसूर, शिक्षण समितीचा अभ्यास दौरा उत्तरांखड, महिला व बाल कल्याण समितीचा दौरा केरळ तर स्थापत्य शहर समितीचा दौरा अंदमान निकोबारला आयोजित करण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यानुसार येत्या काही दिवसांपासून या अभ्यास दौर्‍याला सुरुवात होणार होती. तर वृक्ष प्राधिकरणाच्या माध्यमातून सिंगापूरला अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख