नाशिकच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी आदित्य ठाकरे घालणार लक्ष!

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने नाशिकच्या निसर्गसंपन्न इगतपूरी पिरसरात चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. चित्रपटनिर्मीताला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यामुळे यामध्ये आता थेट आदित्य ठाकरे लक्ष घालणार आहेत
Yuva Sena Workers Met Aditya Thackeray for Dadasaheb Phalke Cine City At Igatpuri
Yuva Sena Workers Met Aditya Thackeray for Dadasaheb Phalke Cine City At Igatpuri

नाशिक :  भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाने नाशिकच्या निसर्गसंपन्न इगतपूरी पिरसरात चित्रनगरी उभारण्याचा प्रस्ताव आहे. चित्रपटनिर्मीताला चालना मिळावी म्हणून हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा ठरेल. त्यामुळे यामध्ये आता थेट आदित्य ठाकरे लक्ष घालणार आहेत. नाशिकच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी तसे संकेत दिले आहेत.

युवा सेनेचे अजिक्‍य गोडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच त्यांची मुंबईत भेट घेतली. तसेच त्यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. यासंदर्भात शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयातून येत्या आठवड्यात यासंदर्भात संबंधितांची बैठक घेण्यात येईल. त्याचे नियोजन संबंधीतांना कळविण्यात येईल असे सुचीत केले आहे.

नाशिक शहरात मराठी तसेच अन्य चित्रपटांच्या चित्रीकरणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी गले काही वर्षे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी इगतपूरी येथे चित्रनगरी उभारण्याचा प्रकल्प नियोजित आहे. शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही पाच वर्षांपूर्वी तसे प्रयत्न केले होते. या अनुषंगाने युवा सेनेचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंकडे पाठपुरावा करीत आहेत. त्याला ठाकरेंकडून प्रतिसाद मिळाला. 

मुंबईपासून दोन तासांचे अंतर, मुंबई व समृध्दी या दोन्ही महामार्गांची कनेक्‍टीव्हीट येथे आहे. त्यामुळे महाबळेश्‍वरनंतरचा सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या, सह्याद्रीचे पठार, निसर्गसंपन्न परिसर, धरणे व नद्यांचा परिसर असलेल्या इगतपूरी भागात चित्रनगरी उभारण्यात स्वतः आदित्य ठाकरे यांनीही रस दाखविला आहे. पुढील आठवड्यात त्याला मुहुर्त मिळेल अशी अपेक्षा स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या कार्यालयाशी शुक्रवारी संपर्क झाला. यापूर्वीच्या पाठपुराव्यातून प्रसाद योजना व चित्रनगरी या प्रकल्पांना आदित्य ठाकरे यांच्याकडून गती मिळेल. त्यासाठी दोन-तीन दिवसांत बैठक अपेक्षीत आहे - अजिंक्‍य गोडसे, नेते, युवा सेना.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com