आदित्यच्या कौतुक सोहळ्याला रश्मीवहिनी आणि उद्धव ठाकरे हजर राहणार 

aditya Rashmivahini uddhav
aditya Rashmivahini uddhav

मुंबई:  निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या  ठाकरे घराण्यातील  पहिल्या उमेदवाराच्या कौतुक सोहळ्याला भाऊ  तेजससह आई वडिल हजार रहणार आहेत .    वरळीत आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे . 

निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्या पहिल्याच ठाकरेंना आदित्यला आज किमान पाच हजार शिवसैनिक मानाची सलामी देणार आहेत.

महालक्ष्मी रेसकोर्सजवळील लाला लजपतराय महाविद्यालयात दुपारी ५ वाजता हा मेळावा होईल.  

वरळी येथे कार्यकर्ता मेळाव्यात आदित्यच्या उमेदवारीची घोषणा होईल.या समारंभाला आदित्य यांनी स्वत: आग्रहपूर्वक आई रश्मीवहिनी यांनी जातीने हजर रहावे असे विनवले आहे.छोटा भाऊ तेजस यासाठी खास लंडनहून आला आहे.

जागावाटप चर्चेत या वेळी सेनेचे पक्षप्रमुख उद्धव यांच्या बरोबरीने आदित्य सहभागी झाले.खांद्याला खांदा लावून चिरंजीव काम करत असल्याने वडिल खूष असणे सहाजिक आहे. 

सेनेच्या सर्व प्रमुख  नेत्यांसह  युवा सेनेचे पदाधिकारी वरूण सरनाईक ,सूरज चव्हाण या आयोजनाकडे लक्ष ठेवून आहेत.आधुनिक विचारांचा उच्चशिक्षित ठाकरे मैदानात उतरत असल्याचा आनंद युवक शिवसेना कार्यकर्त्यात आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com