औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाचे झळकले बॅनर

शिवसेनेच्या फ्लेक्समुळे भाजप मात्र नाराज...
औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाचे झळकले बॅनर

औरंगाबाद : राज्यातील सत्ता संघर्षाला वेग आल्यानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करा म्हणून बॅनर झळकल्यानंतर त्याचे लोण आता औरंगाबादेतही पोहोचले आहे. शहरातील साठे चौकात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदित्य ठाकरे, असा उल्लेख असलेले बॅनर लावण्यात आल्याने याची चर्चा चांगलीच रंगू लागली आहे.

राज्यात सत्तास्थापनेचा खेळ सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदावर दावा करत शिवसेनेने भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत हातमिळवणी करत राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत .

राज्यपालांनी चोवीस तासांची मुदत दिल्यामुळे आघाडी आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकांवर बैठका होत असून आज सायंकाळपर्यंत राज्यात सत्ता कुणाची आणि मुख्यमंत्री कोणाचा याचा निर्णय होईल. दरम्यान मुंबईत मातोश्री बाहेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असे बॅनर झळकायला सुरुवात झाली आहे,  त्याआधी आदित्य ठाकरे यांच्या नावाचे बॅनर मुख्यमंत्री म्हणून झळकले होते . मुंबई वगळता राज्यात मात्र अशी बॅनरबाजी इतर कुठे दिसून आली नव्हती.

औरंगाबादेत मात्र आज महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे असा मजकूर असलेले बॅनर शहरातील साठे चौकात एका शिवसैनिकांनी लावले आहे . नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचे सर्वच्या सर्व सहा उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले . औरंगाबाद जिल्ह्यात नऊ मतदारसंघात शिवसेनेचे सहा तर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाल्याने हा जिल्हा खऱ्या अर्थाने काँग्रेस-राष्ट्रवादी एमआयएम मुक्त झाला. युतीत लढलेल्या शिवसेना-भाजपच्या झोळीत जिल्ह्यातील मतदारांनी भरभरून मतांचे दान दिले.

शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपने बंडखोरी केल्यानंतरही शिवसेनेने इथे विजय मिळवला.  तर मध्य मतदारसंघावरून भाजप-शिवसेनेत सुरू असलेली वादावादी देखील संपुष्टात आली . शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात भाजपचे शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दाखल केलेली उमेदवारी मागे घेऊ युती धर्माचे पालन केले होते.

 मात्र भाजपने लोकसभेच्या वेळी दिलेला शब्द न पाळल्याचा आरोप करत शिवसेनेने राज्यात वेगळी समीकरणे आकाराला नातआणत भाजप शिवाय सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संबोधणारे बॅनर झळकल्याने भाजपच्या गोटात मात्र नाराजी पसरली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com