माझा जोडीदार मीच निवडणार : आदिती तटकरे - Aditi Tatkare says she will select her life partner | Politics Marathi News - Sarkarnama

माझा जोडीदार मीच निवडणार : आदिती तटकरे

आनंद गायकवाड
शनिवार, 18 जानेवारी 2020

संगमनेर येथे अमृतवाहिनवीच्या मेधा महोत्सवात यावर्षी दोन मंत्र्यांसह सहा आमदारांशी संवादाचा आगळावेगळा उपक्रम आयोजित केला होता.

संगमनेर :  आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा विषय त्यांच्या आईकडे सोपवला आहे. मी मात्र माझा जोडीदार स्वतःच निवडणार असल्याचे  बिनधास्त उत्तर उद्योग व राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

संगमनेर येथे अमृतवाहिनवीच्या मेधा महोत्सवात यावर्षी दोन मंत्र्यांसह सहा आमदारांशी संवादाचा आगळावेगळा उपक्रम आयोजित केला होता. आघाडीचा पार्श्वगायक, गीतकार, संगितकार असलेला अवधुत गुप्ते सुत्रसंचालकाची भुमिका निभावताना, मुलाखत कसे घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. मात्र अत्यंत दिलखुलास वातावरणात व खेळीमेळीत झालेल्या या प्रश्नोत्तराच्या खेळात आमदारांनी सहभागी होत मिश्किल जुगलबंदी सादर केली. या उपक्रमाला युवा प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली.  

तटकरे यांनी विविध प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की घरात लहानपणापासूनच राजकीय वातावरण होते. मी महाविद्यालयात आऊटस्टंडींग म्हणजे कायम वर्गाबाहेर राहणारी, विविध खेळात रमणारी मुलगी. यामुळे माझ्या शैक्षणिक करियरबाबत काहीसी साशंकता होती. मी काही डॉक्टर इंजिनिअर होणार नाही, ही खात्री पटल्याने, वडीलांमुळे मी राजकारणात आले. 

शरद पवार हे आदर्श व्यक्तीमत्व आहे. तीन पिढ्यांशी संवाद साधण्याची कला लाभलेले ते नेते आहेत. महिलांना महिलांची खाती मिळतात, हा समज महाविकास आघाडीने खोटा ठरविला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राजकारणात येण्याची प्रेरणा मिळाली. राजकारणात एखाद्याला मिळालेली संधी त्याच्या कष्टामुळे मिळते. घराणेशाहीमूळे राजकारणात यशस्वी होता येते असे नाही, असेही आदिती तटकरे म्हणाल्या .  

प्रत्येक गोष्ट शिकावीच लागते. करुन दाखवले असे सांगण्याजोगे काम आगामी पाच वर्षात करावे लागेल. ज्येष्ठ नेते शरद पवार, सोनिया गांधी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्ष टिकणार असल्याने, आम्हाला पाच वर्ष काम करण्यासाठी मोठी संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख