उत्तर महाराष्ट्रात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंचे 'मतदार जोडो' - Adidya Thakre will Connect To Voters through Social Events | Politics Marathi News - Sarkarnama

उत्तर महाराष्ट्रात सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंचे 'मतदार जोडो'

सरकारनामा ब्युरो
रविवार, 19 ऑगस्ट 2018

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात 23 ऑगस्टपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय विविध कार्यक्रम घेतील.

नाशिक : दोन महिन्यांपूर्वीच उत्तर महाराष्ट्रातील मतदार संघाचा आढावा घेतल्यानंतर आता पुढील आठवड्यापासून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा 23 ऑगस्टपासून उत्तर महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे या निमित्ताने शिवसेना सामाजिक उपक्रमांतुन निवडणुकीच्या तयारीला गती देणार आहेत. 

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे पुढील आठवड्यात 23 ऑगस्टपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत विधानसभा मतदारसंघनिहाय विविध कार्यक्रम घेतील. शिवसेनेचा मुळ पिंड सामाजिक आहे. मात्र, गेले काही वर्षे राजकारण अधिक व सामाजिक उपक्रम कमी अशी स्थिती बनली आहे. त्यामुळे युवा सेनेचे नेते पक्षाला आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून सामाजिक उपक्रमांतुन मतदारसंघनिहाय संपर्क करतील. त्यासाठी विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. 

विविध सामाजिक उपक्रमांची सुरुवात ते यावेळी करतील. या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची दौऱ्याच्या तयारीसाठी बैठक झाली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाप्रमुख विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख महेश बडवे, सचीन मराठे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख