...आता अजितदादांना भावली डाॅ. राजेश देशमुखांची कार्यपद्धती - Why Ajit Pawar Chosen Dr. Rajesh Deshmukh as Pune Collector | Politics Marathi News - Sarkarnama

...आता अजितदादांना भावली डाॅ. राजेश देशमुखांची कार्यपद्धती

चेतन देशमुख
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

सातारा जिल्हा परिषदेत डॉ. राजेश देशमुख यांनी टीम बिल्डिंग, मायक्रो प्लॅनिगने अवघ्या वर्षात मिनीमंत्रालयाचा देशात नावलौकिक होईल, अशी कामगिरी केली. त्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौंर्‍यावर असताना गौरवोदगार काढले होते. त्यांना माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी 'त्यांना तिकडे घेऊन जाऊ नका, येथेच काम करु द्या' अशी टिप्पणी केली होती

यवतमाळ  : सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्याठिकाणी केलेल्या कामांची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. राजेश देशमुख यांचेवर यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी दिली होती. याठिकाणी केलेल्या कामांची दखल आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतली. डॉ. देशमुख यांची पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

सातारा जिल्हा परिषदेत डॉ. राजेश देशमुख यांनी टीम बिल्डिंग, मायक्रो प्लॅनिगने अवघ्या वर्षात मिनीमंत्रालयाचा देशात नावलौकिक होईल, अशी कामगिरी केली. त्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा दौंर्‍यावर असताना गौरवोदगार काढले होते. त्यांना माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांनी 'त्यांना तिकडे घेऊन जाऊ नका, येथेच काम करु द्या' अशी टिप्पणी केली होती. त्यानंतर काही दिवसात डॉ.देशमुख यांच्यावर यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली. 

याठिकाणी देशमुख यांनी अनेक योजनांना गती दिली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा असल्याने शेती तसेच शेतकर्‍यांशी संबंधित विषय 'मिशन मोड'वर घेतले. यात पीककर्ज वाटप, शेततळे, मत्सशेती, रेशीमशेती, सर्वांसाठी घरे, कृषीपंपांना वीजजोडणी, फवारणीतून विषबाधा झाल्याने त्यावर उपाययोजना अशा अनेक महत्वपुर्ण योजनांचा समावेश होता. यवतमाळ येथून त्यांची बदली हाफकीन येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली. कोरोनाच्या काळात या संस्थेचे कार्य महत्वपुर्ण आहे. सातारा, यवतमाळ येथे असताना केलेली कामांची दखल उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतली. त्यामुळेच अनेक नावे स्पर्धेत असतानाही दादांनी डॉ. राजेश देशमुख यांचेवर विश्‍वास टाकला आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख