पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तीन पोलिस बडतर्फ - Three Policemen Suspended in Palghar Lyinching Case | Politics Marathi News - Sarkarnama

पालघर साधू हत्याकांड प्रकरण : तीन पोलिस बडतर्फ

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

१६ एप्रिल २०२० रोजी मुंबईहून सुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुरुवातीला कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलीस शिपायांना यांना निलंबित करण्यात आले होते

विरार : गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणात  सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह  फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

१६ एप्रिल २०२० रोजी मुंबईहून सुरतकडे निघालेले दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावातील वन विभागाच्या चौकीसमोर निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी सुरुवातीला कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार आर. बी. साळुंखे आणि दोन पोलीस शिपायांना यांना निलंबित करण्यात आले होते.

त्यानंतर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.दरम्यान गृहमंत्र्यांच्या भेटीनंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.

गुन्हे अन्वेषण विभागाने याप्रकरणी दाखल केलेल्या तीन तक्रारींमध्ये स्वतंत्रपणे दोषारोपपत्र दाखल केले आहे व याची सुनावणी ठाणे येथील विशेष न्यायालयात होत आहे. या प्रकरणी विभागीय चौकशी करण्यात येत होती. चौकशीअंती कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी सहाय्यक निरीक्षक आनंदराव काळे यांच्यासह   फौजदार रवी साळुंके व पोलीस कॉन्स्टेबल नरेश धोडी यांची पोलीस दलातून हकालपट्टी करण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे
Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख