आमचं काम 'पाणी' देण्याच, मग तुकाराम मुंढे व माझ्यात 'आग' लागेलच कशी? -  गुलाबराव पाटील

अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकिर्द पाहता, पंधरा वर्षात त्यांच्या चौदा बदल्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या ठिकाणी ते वादग्रस्त ठरले आहेत. आता त्यांची बदली जीवन प्राधीकरणात प्रकल्प व व्यवस्थापक सल्लागार म्हणून झालेली आहे. याच विभागाचे मंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आहेत. ते स्वभावानेही फटकळ आणि आक्रमक आहेत
Tukaram Munde - Gulabrao Patil
Tukaram Munde - Gulabrao Patil

जळगाव: आमचं खातं जनतेला पाणी देण्याच आहे. आग लावण्याचे नव्हे. त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढे व माझ्यात आग लागलेच कशी?त्यांच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणार आहोत. असे मत राज्याचे स्वच्छता व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केले.

कठोर व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेचे फायरब्रँड नेते गुलाबराव पाटील पाटील यांच्या कडे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते आहे. त्याच खात्याचे सचिव म्हणून मुंढेचे नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिकारी तुकाराम मुंढे यांची प्रशासकीय कारकिर्द पाहता, पंधरा वर्षात त्यांच्या चौदा बदल्या झाल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांची बदली झाली त्या ठिकाणी ते वादग्रस्त ठरले आहेत. आता त्यांची बदली जीवन प्राधीकरणात प्रकल्प व व्यवस्थापक सल्लागार म्हणून झालेली आहे. याच विभागाचे मंत्री शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील आहेत. ते स्वभावानेही फटकळ आणि आक्रमक आहेत. त्यामुळे दोंघामध्ये जोरदार संघर्ष होणार असे सांगितले जात आहे.

याबाबत राज्याचे पाणी पुरवठा मंत्री व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी सपर्क साधला असता 'सरकारनामा'शी बोलतांना ते म्हणाले, आमचा विभाग हा पाणी विभाग आहेत. त्यामुळे पाणी हे आग विझविण्याचे काम करीत असते. त्यामुळे मुंढे व माझ्यात आग लागेलच कशी?आमच्यात कोणताही संघर्ष होणार नाही हे मी खात्रीने सांगतो. ते एक चांगले अधिकारी आहेत. त्यांना विविध खात्यातील कामांचा अनुभव आहेत. त्यांच्या अनुभवाचा विभागाच्या कामात आपण फायदा करून घेणार आहोत. जनतेला पाणी देण्याच्या योजनांची अमलंबजावणी वेगाने करण्यात येईल. चौकटीच्या बाहेर काम ते करणार नाहीत आपणही करणार नाही. त्यामुळे संघर्षाचा प्रश्‍नच येणार नाही. उलट आपण समोपचाराने जनताभिमुख कामे करणार आहोत. त्यामुळे कुणाला काय वाटते असेल तसे काही होणार नाही. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com