आयुष प्रसाद यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावल प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे. काल राम नवी दिल्लीला पंतप्रधान कार्यालयातील आपला कार्यभार स्वीकारण्यासाठी रवाना झाले. आता नवे जिल्हाधिकारी नियुक्त होईपर्यंत आयुष प्रसाद या पदाचा कार्यभार सांभाळतील
Ayush Prasad will be Acting Collector of Pune
Ayush Prasad will be Acting Collector of Pune

पुणे : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पुण्याच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचा निर्णय विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. याबाबतचे आदेश त्यांनी नुकतेच जारी केले आहेत. नव्या जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक शासनाकडून होईपर्यंत आयुष प्रसाद पुण्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतील.

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावल प्रतिनियुक्तीने बदली करण्यात आली आहे. काल राम नवी दिल्लीला पंतप्रधान कार्यालयातील आपला कार्यभार स्वीकारण्यासाठी रवाना झाले. देशात कोरोनाचे रुग्ण पुण्यात सर्वाधिक होते, त्यावेळी राम यांनी येथील परिस्थिती सक्षमपणे हाताळली होती. याची दखल केंद्र सरकारने घेतली असून त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. राम आता चार वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर दिल्लीत सेवेत राहणार आहेत.

पुण्याचे जिल्हाधिकारीपद पश्‍चिम महाराष्ट्रात महत्वाचे मानले जाते. या पदावर येण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये सुप्त संघर्ष आणि स्पर्धा असते. पुण्यात इतर पदांवर सध्या झालेल्या आधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पाहता डॉ. देशमुख यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता अधिक आहे. आधिकाऱ्यांमधील मराठी-अमराठी तसेच थेट आयएएस आणि स्टेट केडरमधून आयएएसपदी बढती मिळालेले आधिकारी अशी स्पर्धा असते. यातून योग्य समतोल साधत पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असून त्यात पालकमंत्री अजित पवार यांना काय वाटते हेच महत्वाचे ठरणार आहे.

पुण्याच्या जिल्हाधिकारी पदासाठी अनेक नावांची चर्चा असली तरी हाफकिन इन्स्टिट्यऊटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेश देशमुख यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती झाल्याने पुण्याचे नवे जिल्हाधिकारी कोण? याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे. 

या काळात लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुंबई 'म्हाडा'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी आयुष प्रसाद, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, अस्तिककुमार पांडे, एस. पी. सिंग 'पीएमआरडी'चे आयुक्त सुहास दिवसे व पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल या नावांची चर्चा झाली आहे. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे, आस्तिककुमार पांडे यांच्याही नावाची चर्चा आहे. 

डॉ. देशमुख यांची नियुक्ती झाली तर पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविणारे ते चौथे देशमुख ठरणार आहेत. यापूर्वी शिवाजीराव देशमुख, प्रभाकर देशमुख व विकास देशमुख यांनी पुण्याचे जिल्हाधिकारीपद भूषविले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी होण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच चढाओढ असते. मात्र, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मनात कोणता अधिकारी आहे. यावर बरेच काही अवलंबून आहे. डाॅ. योगेश म्हसे, लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याही नांवाची चर्चा सुरु आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com