या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी कोल्हापूर गाजवले... पण त्यांना नागपूर दाखवले.. - These two police officers performed well in Kolhapur but transfered to Nagpur | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य करण्याची राज्य सरकारची तयारी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संभाजीराजे छत्रपती यांची उद्या (17 जून) पाच वाजता वर्षा निवासस्थानी महत्वपूर्ण बैठक
कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनास सुरवात

या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी कोल्हापूर गाजवले... पण त्यांना नागपूर दाखवले..

निवास चौगले
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

चांगल्या पोलिस अधिकाऱ्यांना अडगळीत टाकण्याचा प्रयत्न

कोल्हापूर : काळेधंदेवाल्यासह संघटित गुन्हेगारांच्या मुसक्‍या आवळण्याचे उल्लेखनीय करणाऱ्या शहर पोलिस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व इचलकरंजीचे उपअधीक्षक गणेश बिरादार यांना "नागपूर' गिफ्ट मिळाले. पोलिस दलात डॅशिंग अधिकारी म्हणून चांगले काम केले तर त्याची गैरसोयीच्या ठिकाणी बदली होते हे या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यावरून पुन्हा अधोरेखित झाले.

शहर पोलिस उपअधीक्षक पदाची सुत्रे दीड वर्षापूर्वी प्रेरणा कट्टे यांनी हाती घेतली.  पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कारवाईचा धडाका लावला. गुंडगिरी, अवैध धंदे मोडून काढले. यादवनगर येथे संशयित सलीम मुल्लाच्या मटका अड्डयावर पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी मुल्लाच्या साथिदारांनी पोलिसांवरच हल्ला केला. पोलिस यंत्रणेने या मुल्ला गॅंगवर थेट मोका अंतर्गत कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास शहर उपअधीक्षक कट्टे यांनी सक्षमपणे केला. एक दोन नव्हे तर गुन्ह्यात 44 जणांवर कारवाई केली. त्यातील 42 जणांना अटकही केली. याच प्रकरणातील सम्राट कोराणे याला अजून अटक व्हायची आहे, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्याने धाव घेतली पण न्यायालयानेही त्यांना शरण येण्यास सांगितले.

एवढा खोलवर तपास या प्रकरणाचा कट्टे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर कोल्हापुरातील मटक्‍याचे इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, गुजरात कनेक्‍शन शोधून काढले. गांजा विरोधात आक्रमक पावले उचलली. त्यांच्या नेतृत्वाखाली राजारामपुरी पोलिसांनी 30 किलोहून अधिकचा गांजा जप्त केला. तसेच गांजाचे मिरज, पंढरपूर, ओडिसा, आंध्र प्रदेश पर्यंतचे कनेक्‍शन शोधून काढले. एकंदरीत शहर परिसरात मटका जुगार अड्डे चालवले तर मोका अंतर्गत कारवाई अटळ अशी धास्ती काळेधंद्यांच्यात निर्माण झाली होती. कट्टे यांच्या कार्याची पोलिस महासंचालक कार्यालयानेही दखल घेतली. उत्कृष्ठ तपासाबाबत त्यांना एक लाखांचे पारीतोषकही देऊन गौरविण्यात आले.

पोलिस उपअधीक्षकपदाची गणेश बिरादार हे दीड वर्षापासून इचलकरंजीत कर्तव्य बजावत आहेत. तेलनाडे गॅंगवर मोका अंतर्गत कारवाईने छाप पाडली. त्याचबरोबर फाळकूटदादा, घरफोड्यांना जेरबंद करणे अशा धाडसी कारवाई केल्या. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात थेट रस्त्यावर उतरून नागरिकांचे प्रबोधनाची मोहीम राबवली. नुकताच नूतन पोलिस अधीक्षकांनी पदाची सुत्रे हाती घेतली आहेत. कर्तव्य दक्ष व सक्षमपणे केलेल्या चांगल्या कामाबद्दल या दोन्ही अधिकाऱ्यांना बदली रूपाने चांगले गिफ्ट मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांची थेट नागपूरला झालेल्या बदलीने चांगले काम करणाऱ्यांची गैरसोयीच्या ठिकाणी बदली होते हे पुन्हा अधोरेखित झाल्याचा सूर जिल्हावासीयांतून उमठत आहे.

सूरज गुरव यांना वाद भोवला
कराड शहरचे पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांचीही अवघ्या वर्षभरात नागपुरलाच तडकाफडकी बदली करण्यात आली. श्री. गुरव व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात कोल्हापूर महापालिकेच्या महापौर निवडीवेळी वाद झाला होता. त्यावेळी श्री. गुरव हे करवीरचे पोलीस उपअधीक्षक होते, त्यातून त्यांची बदली रत्नागिरीला व तेथून कराडला झाली होती. वर्षाच्या आतच त्यांच्या झालेल्या बदलीमागे श्री. मुश्रीफ यांच्याशी झालेला वाद कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख