आशा बुचकेंसाठी मी माझ्या कुटुंबाचा एकदा राजकीय बळी दिलाय : आढळराव

आशा बुचकेंसाठी मी माझ्या कुटुंबाचा एकदा राजकीय बळी दिलाय : आढळराव

आळेफाटा : "आशा बुचके यांना शिवसेनेने चार वेळा जिल्हा परिषद व दोन वेळा आमदारकीची उमेदवारी दिली तसेच जिल्हा परिषदेत गटनेतेपद दिले, त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला नाही, असा दावा माजी खासदार व पक्षाचे उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला.

``बुचके यांनी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतील अशी वक्तव्ये केली. त्यांच्या हकालपट्टीचे कारण हे त्यांच्या पक्षविरोधी कारवाया असून, यामध्ये माझ्या लोकसभेच्या पराभवाचा कुठलाही संबंध नाही," असा दावा त्यांनी केला.  चाळकवाडी (पिंपळवंडी) ता. जुन्नर येथे आमदार शरद सोनवणे यांच्या 'रायगड' या संपर्क कार्यालयात तालुक्यातील घडमोडींविषयी वास्तव मांडण्यासाठी (ता.28) शिवसेनेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

आढळराव पाटील म्हणाले की, जुन्नर विधानसभेला सुरुवातीला 2009 मध्ये आशा बुचके यांना शिवसेना तिकिट देत नव्हती. त्यांच्या नावाचा मी आग्रह धरला होता. बुचके यांना जर जुन्नरमधून उमेदवारी द्यायची असेल तर माझ्या पत्नीला आंबेगावला उमेदवारी घ्यावी लागली, अशी अट पक्षाने घातली. पत्नीला मी उमेदवार दिली. त्यात पत्नीचा पराभव झाला. माझ्या कुटुंबाचा मी राजकीय बळी दिला, असा उद्वेग आढळरावांनी व्यक्त केला.

आमदार शरद सोनवणे यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचीही बुचके यांनी स्पष्ट कल्पना होती. त्यामुळे त्यांनी त्याबद्दल त्रागा करण्याचे कारण नाही, असेही आढळराव यांनी स्पष्ट केले.

आमदार शरद सोनवणे म्हणाले की, माझ्यावर परिस्थिती आली (तिकीट कापले), तेंव्हाही मी एका शब्दानेही पक्षाविरोधात बोललो नाही. कुणीही माणूस पक्षापेक्षा मोठा नाही. आशाताई बरोबर आमचा संघर्ष नाही. प्रत्येक शिवसैनिकाच्या घरी जाऊन संघटनावाढीचे काम करणार असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com