आढळराव पाटील व वळसे पाटील यांच्यात हस्तांदोलन 

आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्या बरोबर हस्तांदोलन केले.
walse adhalrao
walse adhalrao

मंचर : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा हे तीन दिग्गज नेते मंगळवारी (ता. २२) मंचर येथे एका समारंभा निमित्त व्यासपीठावर एकमेकांच्या शेजारी बसले होते. त्यांनी एकमेकांकडे पाहून स्मित हास्य करून हळू आवाजात एकमेकांशी कुजबुजही  केली. 


आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्या बरोबर हस्तांदोलन केले. हे तर निवडणूक निकालाच्या आधी वळसे पाटील यांचे अभिनंदनच म्हणावे लागेल. अशी चर्चा उपस्थितात सुरु झाली. हे दृश्य पाहून राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे कार्यकर्ते अचंबित झाले. तर काहींचे चेहरे पाहण्यासारखे झाले. 

 वळसे पाटील, आढळराव पाटील व शहा यांची मैत्री सर्वांना माहित आहे. जिवलग मित्र असा त्यांचा एकेकाळी नावलौकिक होता. पण २००४ मध्ये आढळराव पाटील शिवसेनेत गेले. त्यानंतर मैत्री मध्ये मिठाचा खडा पडला. लोकसभा व नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे रंगलेले युद्धही  जनतेने पाहिलेले आहे. सोमवारी (ता. २१) निवडणूक मतदान झाले. 

मंगळवारी एका  दुकानाच्या उद्घाटन समारंभाला देवेंद्र शहा प्रथम आले होते. त्यानंतर आलेले आढळराव पाटील व शहा यांच्यातही  अधून मधून बोलणे सुरु होते. वळसे पाटील आल्यानंतर ते आढळराव पाटील यांच्या शेजारी बसले. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. त्यांना स्मित हास्य करण्याचा मोह आवरता आला नाही. या जुन्या मित्रांमध्ये सुरु असलेली कुजबुज समोर असलेले लोक पाहत होते. वळसे पाटील यांनी हात पुढे केल्यानंतर क्षणाचाहि विलंब न लावता आढळराव पाटील यांनी वळसे पाटील यांच्या हातावर टाळी दिली. वळसे पाटील यांनीही काही क्षण आढळराव यांचा हात हातात घट्टपणे पकडून ठेवला होता.

    व्यासपीठाच्या समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बाणखेले, बाळासाहेब बेंडे, सुहास बाणखेले, शिवसेनेचे नेते सुनील बाणखेले, उमेदवार राजाराम बाणखेले, अरुण गिरे उपस्थित होते. ज्वेलरीच्या दुकानातहि वळसे पाटील, आढळराव पाटील व शहा यांनी समदडिया व गाडगीळ कुटुंबीया बरोबर फोटो हि काढून घेतले.

निवडणुकीच्या प्रचारातील आरोप प्रत्यारोपाच्या फैरी नंतर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी या तीन नेत्याची झालेली भेट उपयुक्त असल्याची चर्चा जनतेत सुरु झाली आहे. दोघांत काय चर्चा रंगली. व एकमेकाच्या हातात हात का दिला. याबाबत मात्र जनतेत उत्सुकता कायम आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com