आढळरावदादांचे महेशदादांना आवतण; भोसरीत शिवसेनेकडून लढण्याची ऑफर

भाजप लढणार असलेल्या व त्यांचाच सहयोगी सदस्य असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदारसंघावर आज शिवसेनेने दावा ठोकला. त्यामुळे संभाव्य युतीच्या जागावाटपात भोसरीत ट्विस्ट आला आहे. दरम्यान, भोसरीचे अपक्ष आमदार महेशदादा लांडगे यांना भोसरीतून शिवसेनेकडून लढण्याची ऑफर शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली आहे.
Shivajirao Adhalrao - Mahesh Landge
Shivajirao Adhalrao - Mahesh Landge

पिंपरी : भाजप लढणार असलेल्या व त्यांचाच सहयोगी सदस्य असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील भोसरी मतदारसंघावर आज शिवसेनेने दावा ठोकला. त्यामुळे संभाव्य युतीच्या जागावाटपात भोसरीत ट्विस्ट आला आहे. दरम्यान, भोसरीचे अपक्ष आमदार महेशदादा लांडगे यांना भोसरीतून शिवसेनेकडून लढण्याची ऑफर शिवसेनेचे उपनेते व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी या दोन्ही दादांतील पाच वर्षाचे वैर संपुष्टात आले. त्यावेळी आढळराव यांनी भोसरी विधानसभेला लांडगेसाठी सोडू, असे आश्वासन दिले होते. दरम्यान, नुकतेच लांडगेंना मातोश्री भेटीचे निमंत्रणही आले. मात्र, ते अद्याप गेलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर आढळराव यांनी आज भोसरीत पत्रकारपरिषदेत भोसरी मतदारसंघ हा शिवसेनेकडे घेण्याची पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे सांगितले. ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार असल्याचेही ते म्हणाले. त्याजोडीने भाजपचे आमदार असलेला हडपसर,शिरूर तसेच आंबेगाव, जुन्नर या मतदारसंघावरही दावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दहा वर्षापूर्वी २००९ ला युती असताना भोसरी शिवसेनेकडे होता. तर, गतवेळी २०१४ ला ती नसताना शिवसेनेचा उमेदवार येथे दुसऱ्या नंबरवर होता. यावेळी युती झाली,तर शिवसेनेचा आमदार नक्की निवडून येणार असे जुन्या,नव्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याने त्यासाठी आग्रही राहण्याची मागणी त्यांनी केली असल्याचे आढळराव म्हणाले. दरम्यान, मातोश्री भेटीला न गेलेले लांडगे आढळरावांचे शिवसेनेत येण्याचे आवतण स्वीकारण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. तर, शिवसेनेने आग्रह धरून हा मतदारसंघ पुन्हा आपल्या पदरात पाडून घेतला, तर महेशदादा पुन्हा अपक्षच लढणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com