माझ्या नादी लागू नका; हा शेवटचा इशारा : आढळरावांचे वळसेंना आव्हान

माझ्या नादी लागू नका; हा शेवटचा इशारा : आढळरावांचे वळसेंना आव्हान

पुणे : विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जस जशा जवळ येऊ लागल्या तसे तशे आरोप प्रत्यारोप, इशारांच्या भाषा सुरु झाल्या आहेत. आपण मंजूर करून आणलेल्या आणि मार्गी लावलेल्या विकासकामांची उद्घाटने आमदार दिलीप वळसे पाटील करीत असल्याचा आरोप माजी खासदार आणि शिवसेना उपनेते  शिवाजीराव आढळराव यांनी केला आहे. आम्ही १५ वर्षे तुमच्या नादी लागलो नाही, तुम्ही खोट्याचा आधार घेऊन आमच्या नादी लागू नका, असा निर्वाणीचा इशारा आढळरावांनी दिला आहे.

आढळराव पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे, कि,‘‘गेली ३० वर्षांपासून आंबेगाव विधानसभेचा आमदार व स्वतःला राज्याचे अभ्यासू नेतृत्व, भाग्यविधाता अशी स्वतःहून बिरुदं लावून घेणारा माणूस गावागावातील दुसऱ्यांनी मंजुरी आणलेल्या कामाचं श्रेय लाटण्यासाठी इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे पाहून त्यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते.

मी कधीही तुमच्या कामात अडथळा आणला नाही, मात्र तुम्ही वारंवार माझ्या विकासकामात अडथळे निर्माण करण्यासाठी कसर सोडली नाही. आता हे सर्व अति करायचे उद्योग ताबडतोब थांबवा. आम्ही १५ वर्ष तुमच्या नादी लागलो नाही, तुम्ही खोट्याचा आधार घेऊन आमच्या नादी लागू नका हा स्पष्ट आणि निर्वाणीचा इशारा समजा, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

लोकांची मागणी लक्षात घेऊन आवश्यक पाठपुरावा करून आम्ही मंजूर केलेली कामे स्वतः मंजूर केल्याच्या थाटात दाखवून लोकांना मूर्ख बनवण्याचे उद्योग विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरु केले आहेत हे तुमच्या पदाला अजिबात शोभत नाही. असे करून तुम्ही तुमच्या पदाचा अपमान करीत आहात. या तुमच्या घाणेरड्या राजकारणाचा आता तालुक्यातील जनतेला पुरता वीट आला आहे, अशी टीका त्यांनी केली.

गावागावातील छोट्या मोठ्या न केलेल्या कामांचे श्रेय लाटून स्वतःचे हसू करून घेण्यापेक्षा इतकी मंत्रिपदे उपभोगूनदेखील तालुक्यातील महत्वाचे असणारे कळमोडी, म्हाळसाकांत, पांडवदरा यासारखे पाणी पुरवठ्याचे प्रश्न, आदिवासी भागातील लोकांचे प्रश्न, भीमाशंकर विकास आराखडा, डिंभ धरणग्रस्तांचे पुनर्वसन यासारखे अनेक प्रश्न ३० वर्षांत तुम्हाला का मार्गी लावता आले नाही? मी मंजूर केलेली कामे दाखवण्यापेक्षा गेल्या ५ वर्षात आपण जनतेची नक्की काय कामं केली? याचा हिशोब आधी जनतेला द्या, असे आव्हान आढळरावांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com