adhalrao asks question to kolhe | Sarkarnama

तेव्हा अमोल कोल्हे संसदेतून का पळून गेले : आढळरावांनी विचारला सवाल

उत्तम कुटे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पिंपरी :  लोकसभेत मतदान करण्याऐवजी जे काश्मिरी नेत्यांच्या इशाऱ्यावरुन पळून जातात त्यांनी माझ्या निवृत्तीची, नैराश्याची किंवा मी विश्राम करण्याची नाही, तर स्वत:च्या देशद्रोही भूमिकेची काळजी करावी, असा पलटवार  शिवसेना  उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर  केला.

कोल्हे यांना निवडून दिल्याचा लोकांना आता पश्चाताप होत असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यावर जनतेने दिलेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा, असा हल्लाबोल कोल्हे यांनी आढळरावांवर केला होता. त्याचा समाचार  आढळरावांनी घेतला.

``मी राष्ट्रवादीच्या नाकावर टिच्चून पुणे जिह्यात १५ वर्षे खासदार राहिलोय. शिवसेना आता राज्यातील आणि सत्तेतील अव्वल पक्ष झालाय. खूप मस्ती, भ्रष्ट्राचार आणि राजकारण केल्यानेच लोकांनी राष्ट्रवादीला राज्यातून संपविली आहे. त्यामुळे तुम्ही सगळेच नैराश्यात आहात. हे मी जाणतो. त्यामुळे उगाच हुरळून जावून मला टार्गेट करण्यापेक्षा आता कधी तरी पक्षाचा नेमका विचार, नेमकी भूमिका जाहिर करावी,असे आव्हान आढळराव यांनी राष्ट्रवादी व कोल्हे या दोघांनाही दिले आहे. त्यातून संसदेतून कोल्हे का पळून गेले तेही आम्हाला समजून जाईल, असे ते म्हणाले.

तुमच्या पायगुणाने राष्ट्रवादीची अवस्था राज्य जाणतोय. मी मात्र मतदारसंघात अजुनही फिरुन लोकांच्या प्रश्नासाठी कामच करतोय, असा जोरदार टोला आढळरावांनी कोल्हेंना लगावला. ३७० कलम काश्मीरमधून हटविण्याच्या संसदेतील चर्चेदरम्यान काश्मीरचे नेते फारुक अब्दुलांच्या इशा-यावर आणि त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत बोलल्या. मात्र कोल्हे पळून गेले. या विषयावरील मतदानाला गैरहजर राहिले, असा आरोप आढळरावांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख