पोलिस महासंचालक अर्चना त्यागींनी काढली कामचुकारांची खरडपट्टी 

कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह लिपिक वर्गाच्या कामाची तपासणी त्यांनी सुरू केली. यात प्रलंबित कामे असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.
Archana-Tyagi-DG
Archana-Tyagi-DG

कोल्हापूर :  राज्य राखीव दलाच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी यांनी भारत राखीव बटालियन तीनची  तपासणी सुरू केली. यावेळी त्यांनी  कामचुकार कर्मचाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. 


दुपारी त्यांनी बटालियनसाठीच्या नंदगाव (ता. करवीर) येथील नियोजित जागेची पहाणी केली. कडक पद्धतीने सुरू असलेल्या या तपासणीमुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

कसबा बावडा येथील भारत राखिव बटालियन (3), राज्य राखिव पोलिस बल गट क्रमाक 16 (आयआरबी) च्या कार्यालयाची तपासणीसाठी राज्याच्या अपर पोलिस महासंचालक अर्चना त्यागी आज कोल्हापुरात दाखल झाल्या. त्यांचे स्वागत समादेशक जयंत मिना यांनी केले. 


आधी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह लिपिक वर्गाच्या कामाची तपासणी त्यांनी सुरू केली. यात प्रलंबित कामे असणाऱ्या कर्मचाऱ्यांची त्यांनी चांगलीच कानउघाडणी केली.

प्रसार माध्यमांशी बोलताना त्यागी म्हणाल्या,  सरकारी नोकरदारांनी आपले काम नियमाप्रमाणेच करणे अपेक्षित आहे. सध्या या कामाबद्दल आपण समाधानी आहोत. आयआरबीच्या पथकाने महापूर, लोकसभा, विधानसभा निवडणूक, गणेशोत्सव अशा ठिकाणी केलेले बंदोबस्ताचे काम हे उल्लेखनीय आहे. 


वर्षातील 365 दिवसापैकी 250 दिवस कर्मचारी घराबाहेर बंदोबस्तातच असतात. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने देशात ठसा उमठवला असून प्रत्येक राज्यात आयआरबीला मागणी आहे. ते त्याचे यश म्हणावे लागेल, असेही त्या म्हणाल्या. 


 विभागातील 54 अधिकाऱ्यांपैकी 32 जणांना बढती प्राप्त झालेली आहे. उपलब्ध जागेची मर्यादा आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे संबधित अधिकाऱ्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. नव्या भरती प्रक्रियेला अद्याप सुरवात झालेली नाही. पर्यायी व्यवस्था करून बढती झालेल्या अधिकाऱ्यांना संबधित जागी नियुक्त करण्याची पूर्तता करण्याचे आदेश विभागाला देण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com