...आणि अभिनेता अमोल कोल्हेंमधील डॉक्टर जागा झाला !

डॉ. कोल्हे यांनी मुंबईतील प्रसिद्ध जी. एस. मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे.
actor amol-kolhe-becomes-doctor again
actor amol-kolhe-becomes-doctor again

औरंगाबाद : डॉ. अमोल कोल्हे हे एक कसलेले अभिनेते आहेत. उत्तम राजकीय वक्तेही आहेत. पण ते ‘निष्णात डॉक्टर’ सुद्धा असल्याचा प्रत्यय आज शिवस्वराज्य यात्रेत आला. शिवस्वराज्य यात्रा आज गुरुवारी जिंतूर येथे आलेली असताना अमोल कोल्हे यांच्यातील डॉक्टर जागा झाला . 

त्याचे झाले असे , शिवचरित्रकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अमोल मिटकरी यांचा घसा खराब झाला होता. त्यासाठी औषध आणा अशी सुचना अजितदादा पवार यांनी स्वीय सहायकाला केली. कोणते औषध आणावे असा प्रश्न पडलेला यावेळी उभा राहिला .  हे ऐकताच अमोल कोल्हे यांच्यातील ‘डॉक्टर’ जागा झाला, अन् त्यांनी औषधांची यादीच लिहून दिली. कोल्हे यांच्यातील ‘डॉक्टर’मुळे मिटकरी यांच्या घशावर मात्र खात्रीशीर इलाज झाला.     

डॉ. कोल्हे यांनी मुंबईतील प्रसिद्ध जी. एस. मेडिकल महाविद्यालयातून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी महाविद्यालयातील एकांकिका व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनयाला सुरूवात केली होती. पुढे ते उत्तम अभिनेते झाले. राजकारणातही ते आता छाप पाडत आहेत. पण गरज पडेल तेव्हा रूग्णांवर उपचार सुद्धा करू शकतो हे त्यांनी आज दाखवून दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com