बाहेरून आलेल्यांची माहिती लपवाल तर नातेवाईकांवरही कारवाई करणार - अब्दुल सत्तार

लाॅकडाऊनच्या काळात बाहेरून आलेल्याची माहिती लपवाल तर संबंधित व्यक्तीसह नातेवाईकांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
 action will be taken if anybody conceals information of outsider warns minister abdul sattar
action will be taken if anybody conceals information of outsider warns minister abdul sattar

औरंगाबाद: कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. या काळात बाहेरून आलेल्याची माहिती लपवाल तर संबंधित व्यक्तीसह  नातेवाईकांवर देखील कारवाई केली जाईल असा इशारा राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.

शिवाय हातावर काम करणार्‍या नागरिकांना अन्नधान्यच्या मदतीची गरज आहे . शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या मदतीला अजून दोन-तीन दिवस लागतील.  तोपर्यंत आपले लोकप्रतिनिधी ,मित्र मंडळ, व्यापारी बांधव आदींनी गोरगरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्याची मदत करावी असे आवाहनही  अब्दुल सत्तार यांनी केले.

सदरील मदत घरपोच देण्याआधी पोलिस अधिकाऱ्यांची परवानगी घेणे अनिवार्य असून मदत वाटप करत असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये सुरक्षित अंतर ठेवून दोन-तीन लोकांपेक्षा अधिक लोकांची गर्दी होणार नाही याची कटाक्षाने खबरदारी घ्यावी अशा सूचनाही अब्दुल सत्तार यांनी दिल्या.

 सिल्लोड तालुका जिनिंग-प्रेसिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सिल्लोड -सोयगाव मधील गोरगरीब व गरजू लोकांना घरपोच अन्न देण्याची तयारी दर्शवली आहे. सरकार व विविध सामाजिक संस्था, व्यक्तीच्या माध्यमातून नागरिकांना मदत होणार असल्याने नागरिकांनी भयभीत न होता घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन देखील अब्दुल सत्तार यांनी केले आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण शर्तीचे प्रयत्न करीत आहोत. असे असले तरी मुंबई, पुणे किंवा इतर बाहेरून कोणी आपल्या घरी किंवा शेजारी आले असतील तर त्याची माहिती त्वरित नगर परिषद, महसूल विभाग किंवा पोलिसांना द्यावी.

बाहेरून आलेल्या नागरिकांची तपासणी होणे गरजेचे आहे, अशा लोकांना क्वारंटाईनमध्ये ठवेने गरजेचे असून बाहेरून आलेल्या लोकांची खबरदारीचा उपाय म्हणून केवळ तपासणी करणे गरजेचे आहे.

नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही. जर कोणी बाहेर गावाहून आले असेल आणि त्याने माहिती लपविली तर त्याच्य व नातेवाईकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही अब्दुल सत्तार यांनी दिला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com