Action should be taken against Udhhav Thakare | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

अहमदनगर जिल्ह्यात 5 वाजे पर्यंत 62.86% मतदान
सिंधुदुर्गात सरासरी 60 टक्के मतदान
पिंपरी चिंचवडला सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले सरासरी ४८.३७ टक्के मतदान.
बारामतीत संध्याकाळी पाच पर्यंत 64 टक्के मतदानाची नोंद
जालना जिल्हा दुपारी 3-00 पर्यंत 50.29 टक्के मतदान
परभणी जिल्ह्यात दु. ३ पर्यंत 47.53 टक्के मतदान
पनवेल विधानसभा मतदार संघामध्ये दुपारी 3.00 पर्यंत 38.93% मतदान
जळगाव जिल्ह्यात दुपारी 3.00 वाजेपर्यंत 39.96% मतदान
बीड परळी - दुपारी ३ पर्यंत ४७.१८ टक्के मतदान
नाशिकला दुपारी ३ पर्यंत ४५ टक्के मतदान
ठाणे जिल्हा : दुपारी 3.00 वाजेपर्यंत 35.50 टक्के मतदान
हडपसर मतदार संघातून दुपारी तीन वाजेपर्यंत 41.16 टक्के मतदान

उद्धव ठाकरेंवरच कारवाई हवी : प्रमोद जठार

सरकारनामा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

 रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे.

वैभववाडी :  रत्नागिरी-सिंधुदुर्गातील आठ पैकी कणकवली विधानसभा हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला असताना तेथे शिवसेनेने एबी फॉर्म देऊन युतीला तडा दिला आहे. त्यामुळे एबी फॉर्म देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर महायुतीने कारवाई करायला हवी, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे व्यक्त केले.

येथील स्वाभिमान पक्षाच्या कार्यालयात जठार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी सुधीर नकाशे, मंगेश गुरव, दिगंबर मांजरेकर, रत्नकांत कदम आदी उपस्थित होते. 

जठार म्हणाले, "रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ पैकी कणकवली हा एकमेव मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला आहे. तेथे कोण उमेदवार द्यायचा हा आमच्या पक्षाचा प्रश्‍न होता; परंतु शिवसेनेने विश्‍वासघात करीत सतीश सांवतांना एबी फॉर्म दिला. महायुतीला तडा देण्याचे काम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्यामुळे महायुतीने सर्वात पहिली कारवाई त्यांच्यावर करायला हवी. "

ते म्हणाले, ""कणकवलीतुन सतीश सावंत यांची उमेदवारी ही बेकायदेशीर आहे. वेळ गेलेली नाही. शिवसेनेने अजुनही कणकवलीतून माघार घ्यावी. आम्ही उर्वरित दोन मतदारसंघातून माघार घ्यायला तयार आहोत. सांवतवाडी आणि कुडाळचे भाजप पुरस्कृत उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे त्या उमेदवारांसह मुख्यमंत्री कारवाई करणार आहेत, असा सोशल मीडियावर फिरणारा मेसेज हा फेक आहे. पक्ष माझ्यावर कधीही कारवाई करणार नाही.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख