जाता जाता एसपी दिवाणांचा तडाखा; बदलीच्या दिवशी दोन लाचखोर पकडले

जाता जाता एसपी दिवाणांचा तडाखा; बदलीच्या दिवशी दोन लाचखोर पकडले

सोमवारी (ता.15) बदली झालेले पुणे एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण यांनी जाता जाताही लाचखोरांना तडाखा दिला.बदलीच्या दिवशीही त्यांच्या यशस्वी मार्गदर्शनामुळे पुणे जिल्ह्यात दोन लाचखोर पकडण्यात आले. त्यात एक तहसीलदार हे प्रथम श्रेणी अधिकारी आहेत.

पिंपरी : सोमवारी (ता.15) बदली झालेले पुणे एसीबीचे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) संदीप दिवाण यांनी जाता जाताही लाचखोरांना तडाखा दिला.बदलीच्या दिवशीही त्यांच्या यशस्वी मार्गदर्शनामुळे पुणे जिल्ह्यात दोन लाचखोर पकडण्यात आले. त्यात एक तहसीलदार हे प्रथम श्रेणी अधिकारी आहेत. 

एवढेच नाही,तर आपल्या दोन वर्षाच्या टर्ममध्ये त्यांनी आपल्या युनीटची कामगिरी राज्यात अव्वल ठेवली. त्यामुळे एक नंबर टिकविण्याचा पुणे युनीटचा गेल्या पाच वर्षापासूनचा रेकॉर्ड अबाधित राहिला आहे.2014 पासून पुणे युनीट हे राज्यात सर्वाधिक लाचखोरांना पकडण्याची कामगिरी करीत आहे.यावर्षीही 15 जुलैपर्यंत म्हणजे पहिल्या साडेसात महिन्यात राज्यातील लाचखोरीच्या 478 पैकी सर्वात जास्त म्हणजे 104 ट्रॅप पुणे युनीटने केले आहेत.

सोमवारी दिवाण यांच्या बदलीचा आदेश आला. तरी त्यांचे काम इतर दिवसांसारखे धडाक्यात सुरुच होते. यादिवशी पुणे जिल्ह्यात दोन ट्रॅप झाले. दोन्हीत महिला लाचखोर पकडण्यात आले.त्यातील पहिल्या घटनेत विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना जुन्नर तालुक्यातील नागापूर जाधववाडी सज्जाच्या ग्रामसेविका सायरा पटेल (वय 42) यांना पकडण्यात आले.तर दुसऱ्या घटनेत आंबेगावच्या तहसीलदार सुषमा पैकेकरी व त्यांचा कारकून राकेश लाडके यांना एक लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. गौण खनिजाची अवैध वाहतूक करताना जप्त केलेले वाहन सोडण्यासाठी तसेच गौण खनिज परवाना देण्यासाठी त्यांनी लाच घेतली होती. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com