भ्रष्टाचाऱ्यांना रंगे हात पकडण्यात पुणे राज्यात पहिले तर अमरावती दुसरे 

भ्रष्टाचाऱ्यांना रंगे हात पकडण्यात पुणे राज्यात पहिले तर अमरावती दुसरे 

लाच घेणे, देणे कायद्याने गुन्हा आहे. कुणी अधिकारी, खासगी व्यक्ती लाच मागत असेल, अशांविरुद्ध तक्रार नोंदविण्यास पुढाकार घेतल्यास गैरप्रकाराला आळा बसेल. तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात.-श्रीकांत धिवरे, पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती.

अमरावती : लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग पहिल्या, तर अमरावती दुसऱ्या स्थानी आहे. राज्यात आठ विभागांत एसीबीने एकूण 292 सापळे रचले. त्यात 300 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

राज्यात नागपूर विभागाचा तिसरा क्रमांक आहे. या विभागाने 39 वेळा सापळे रचले असून, तेवढेच गुन्हेसुद्धा दाखल केले. महाराष्ट्रात पुण्यानंतर विदर्भातील अमरावती आणि नागपूर विभाग 2019 मध्ये लाचखोरांविरुद्ध कारवाई करण्यात अग्रेसर ठरले आहे. पुणे विभागात 58 सापळे लाचखोरांविरुद्ध, तर दोन अपसंपदा बाळगल्याप्रकरणी, अशा एकूण 60 गुन्ह्यांची नोंद आहे. 

अमरावतीत 47 लाचखोरांविरुद्धचे सापळे असून, दोन अपसंपदा बाळगल्या प्रकरणातील अशा 49 गुन्ह्यांचा समावेश आहे. नागपूर विभागात अपसंपदा बाळगल्याप्रकरणी एकाही गुन्ह्याची नोंद नाही. मुंबई विभागात चालू वर्षात 17 लाचखोर, तर एक अपसंपदा बाळगल्या प्रकरणात गुन्ह्याची नोंद आहे. ठाणे विभागात 33 सापळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी केले. एक अपसंपदेचा गुन्हा दाखल आहे. 

औरंगाबाद विभागात 37 गुन्हे, नांदेड 28, नाशिक 36 लाचखोरांविरुद्ध गुन्हे दाखल असून, अन्य मार्गाने भ्रष्टाचाराचाही एक गुन्हा नाशिक विभागात दाखल आहे. राज्यात 250 गुन्ह्यांचे तपास प्रलंबित आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात आठ गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रही दाखल झालेले आहेत.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com