खादी ग्रामोद्योगचा अधिकारी चार हजार लाच घेताना जाळ्यात

खादी ग्रामोद्योगचा अधिकारी चार हजार लाच घेताना जाळ्यात

कोल्हापूर : कर्जावरील सबसिडी मंजूर करून देण्यासाठी चार हजाराची लाच स्विकारताना मुंबईतील खादी व ग्रामोद्योग आयोग कार्यालयाचा सहायक संचालक (वर्ग2) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.  बसवराज शांताप्पा मालगट्टी (वय 59 रा. मुंबई) असे संशयिताचे नाव आहे. रंकाळा टॉवर परिसरात काल विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.

यवलूज (ता. पन्हाळा) परिसरातील तक्रारदार यांची "हर्ष आईस्क्रिम फॅक्‍टरी' आहे. त्यांनी या व्यवसायासाठी 2013 मध्ये यवलुज (ता. पन्हाळा) येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेतून जिल्हा उद्योग भगवमार्फत चार लाख कर्ज घेतले होते. त्याला 25 टक्के शासनाची सबसीडी होती. त्यांनी हे कर्ज 2016 मध्ये फेडले. त्यानंतर सबसीडी शासनामार्फत (जिल्हा उद्योग भवन) मार्फत बॅंकेच्या खात्यावर परस्पर जमा होणे अपेक्षित होते. गतवर्षी जिल्हा उद्योगभवन मार्फत फॅक्‍टरीची तपासणी मोहन कदम यांनी केली. त्यानंतर त्याचा अहवाल मुंबईतील चर्चगेट येथील खादी ग्रामोद्योग आयोग कार्यालयाकडे पाठवला होता. तरीही सबसीडीची रक्कम तक्रारदारांच्या बॅंक खात्यावर जमा झाली नव्हती.

याबाबतची चौकशी तक्रारदारांनी जिल्हा उद्योगभवनात केली. तेथे त्यांना हे प्रकरण मुंबईतील खादी ग्रामोद्योग कार्यालयात प्रलंबित असल्याचे समजले. त्यानुसार तक्रारदार मुंबईतील कार्यालयात गेले. तेथे त्यांनी सहायक संचालक बसवराज मालगट्टीची भेट घेतली. त्याने फॅक्‍टरीच्या कामासंबधीचा अहवाल चांगला नसल्याचे सांगितले. त्याने आज कोल्हापुरात येणार असून फॅक्‍टरीची तपासणी करून सबसीडीचे काम करून देतो असे सांगितले.

आज तक्रारदारांना संशयित मालगट्टीचा फोन आला. त्याने मध्यवर्ती बसस्थानक येथील एका हॉटेलवर भेटण्यास बोलवले. त्यानुसार तक्रारदार त्याला भेटण्यासाठी गेले. त्याने फॅक्‍टरीची तपासणी करून चांगला अहवाल करून देण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती ही रक्कम चार हजार रुपये ठरली. ही रक्कम देण्यासाठी रंकाळा टॉवर येथे येण्यास त्याने तक्रारदारांना सांगितले. याबाबतची तक्रार तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार रंकाळा टॉवर परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्राराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना संशयित बसवराज मालगट्टी याला आज पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई उपअधीक्षक आदिनाश बुधवंत, कर्मचारी मनोज खोत, नवनाथ कदम, मयुर देसाई, चालक सूरज अपराध आदींनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com