ACB NABS HEADMASTER | Sarkarnama

`गुणवंत` मुख्याध्यापकाला लाच घेतल्याबद्दल अटक

चिंतामणी क्षीरसागर
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

वडगाव निंबाळकर : बाबुर्डी (ता. बारामती) येथिल माध्यमिक विद्यालयातील मुख्यापकासह शिपायाला शाळेतील कर्मचाऱ्यामार्फत लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. 30) दुपारी पकडले.

मनोहर किसन खोमणे असे मुख्याध्यापकाचे तर नवनाथ विवेक पवार असे लाच घेणाऱ्या शिपायाचे नाव आहे. दोघेही कोऱ्हाळे बुद्रुक (ता. बारामती) येथील आहेत. शाळेतील एका कर्मचाऱ्याच्या सेवा पुस्तकातील नोंदी व कालबद्ध वेतन निश्चित करण्यासाठी मुख्याध्यापक मनोहर याने 4 हजार 100 रूपयांची मागणी केली होती.

याबाबत लाच लुचपत विभागाचे पोलिस निरिक्षक संजय पतंगे, पोलिस नाईक शिर्के, मुंडे पोलिस कॉन्टेबल बडदे यांनी सापळा लाउन शाळेतच पकडले. याबाबत रात्री उशीर पर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम वडगाव निंबाळकर पोलीस ठाणेमधे सुरू होते. मनोहर यांना बारामती तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाकडुन गुणवंत मुख्याध्यापक म्हणुन गौरवण्यात आले होते.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख